Mozambique Tur : तूर पाठवा नाहीतर करार रद्द करू; भारताचा मोझांबिकला इशारा

Tur Import : मोझांबिकमध्ये तुरीचा स्टाॅक आहे. पण जास्त भावाच्या अपेक्षेने ही तूर निर्यात होत नाही. त्यामुळे शेवटी भारत सरकारने मोझांबिकला करार रद्द करण्याचा इशारा दिला.
Tur Market
Tur MarketAgrowon

Tur Import News : भारताला गरज असूनही आणि निर्यातीचे करार असतानाही मोझांबिकने तूर निर्यात कमी केली. मोझांबिकमध्ये तुरीचा स्टाॅक आहे. पण जास्त भावाच्या अपेक्षेने ही तूर निर्यात होत नाही. त्यामुळे शेवटी भारत सरकारने मोझांबिकला करार रद्द करण्याचा इशारा दिला.

भारतात सध्या तुरीची टंचाई आहे. तुरीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत देशात तूर डाळीचे भाव वाढले आहेत. भारत सरकारने याधीच मोझांबिकसोबत २०२५-२६ पर्यंत प्रत्येक वर्षी दोन लाख टन तूर आयातीचे करार केले आहेत. मोझांबिकमधील तुरीची काढणी कधीच झाली. मोझांबिकमध्ये तुरीचा स्टाॅकही आहे.

पण भारतातील दरवाढ पाहून मोझांबिकमधील निर्यातदार तुरीची कमी प्रमाणात निर्यात करत आहेत. मोझांबिकच्या तुरीलाही भारतात चांगला भाव मिळत आहे. पण येथील निर्यातदारांना आणखी भावाची अपेक्षा आहे.

Tur Market
Tur Market : आयातजीवी सरकारला मोझांबिकचा झटका

मोझांबिकमधील निर्यातदार भारताच्या अडचणीचा फायदा घेण्यासाठी तूर निर्यातीला जाणूनबूजून उशीर करत आहेत. त्यामुळे मोझांबिकसोबतचे करार रद्द करावेत अशी मागणी इंडिया ग्रेन्स अॅन्ड पल्सेस असोसिएशन अर्थात आयपीजीएने केली होती.

आता केंद्र सरकारनेही मोझांबिकला इशारा दिला आहे. आयातीचे करार मोडले तर मोझांबिकला अडचणींना सामोरे जावे लागेल. कारण मोझांबिकमध्ये तुरीची डाळ खाल्ली जात नाही. केवळ निर्यातीसाठी तुरीचे उत्पादन घेतले जाते.

Tur Market
Tur Crop Condition : खानदेशात कोरडवाहू तूर स्थिती बनतेय बिकट

मोझांबिकमधून तूर निर्यात कमी होत असल्याचा मुद्दा केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांनी मोझांबिकच्या उच्चायुक्तांकडे उपस्थित केला होता. तेव्हा मोझांबिककडून हा प्रश्न तत्काळ निकाली लावू असे आश्वासन देण्यात आले होते.

पण अजूनही यावर काहीच हालचाली झाल्याचे दिसून येत नाही. मोझांबिकमधून जुलै महिन्यापासूनच तुरीची निर्यात कमी झाली होती. हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. भारत सरकारही याविषयावर गांभीर्याने विचार करत आहे.

(ॲग्रो विशेष)

बंदरांवर २ लाख टनांचा स्टाॅक

मोझांबिकमध्ये तुरीचा स्टाॅक उपलब्ध आहे. पण भारतात तुरीचे भाव वाढत असल्याने याचा फायदा घेण्यासाठी मोझांबिक कमी निर्यात करत आहे. मोझांबिकच्या बंदरांवर दीड ते दोन लाख टनांचा स्टाॅक पडून असल्याची चर्चा आहे. तुरीच्या भावात आणखी सुधारणा होण्याची वाट पाहत निर्यातदारांनी हा स्टाॅक रोखल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com