
केंद्र सरकारने नैसर्गिक शेतीसाठी (Natural Farming) शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन निधीमध्ये वाढ करावी, अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
निती आयोगातर्फे (Niti Aayog) दिल्लीत आयोजित केलेल्या 'इन्नोव्हेटिव्ह ॲग्रीकल्चर' या विषयावरील कार्यशाळेत योगी आदित्यनाथ व्हर्च्युअली सहभागी झाले होते. यावेळी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात नैसर्गिक शेतीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. याशिवाय नैसर्गिक शेतीला (Natural Farming) चालना देण्यासाठी म्हणून केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन निधीत वाढ करण्याची गरजही व्यक्त केली आहे.
नैसर्गिक शेतीच्या (Natural Farming) उत्पादनांच्या ब्रॅण्डिंग आणि विपणनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याबरोबरच प्रोत्साहन निधीतही वाढ करणे आवश्यक आहे. नैसर्गिक उत्पादनांची ब्रॅण्डिंग, विपणन हे मोठे आवाहन आहे. त्याबाबतही विशेष प्रयत्न करण्याची असल्याचे योगी म्हणाले आहेत.
परंपरागत कृषी विकास योजनेत (Paramparagat Krishi Vikas Yojana) शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी जेवढा प्रोत्साहन निधी देण्यात येतो तेवढाच निधी नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही देण्यात यावा, असा आग्रह योगी यांनी धरला आहे.
परंपरागत कृषी विकास योजने (Paramparagat Krishi Vikas Yojana) अंतर्गत सेंद्रिय शेतीसाठी (Organic Farming) प्रति हेक्टरी ५० हजारांचा प्रोत्साहन निधी देण्यात येतो. ज्यात तीन वर्षांसाठीच्या शेतकऱ्यांच्या प्रति हेक्टरी ३१ हजार रुपयांचा समावेश असतो.
याच योजनेच्या अंतर्गत भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती (Bharatiya Prakritik Krishi Paddati ) या उप योजने अंतर्गत हेक्टरी २१ हजारांचा निधी देण्यात येतो, ज्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून देण्यात येणाऱ्या २ हजार रुपयांच्या निधीचाही समावेश होत असल्याचेही योगी म्हणाले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात नैसर्गिक शेती (Natural Farming) केली जात आहे. येत्या खरिपापासून राज्य सरकारच्या, कृषी विभागाच्या अखत्यारीतील १३५ शेतजमिनींमध्ये नैसर्गिक शेती केली जाणार आहे. पाच कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि १० विभागीय कृषी चाचण्या व प्रात्यक्षिक केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे प्रवृत्त करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही योगी यांनी सांगितले आहे.
राज्यातील ३५ जिल्ह्यांत भारतीय पारंपरिक कृषी पद्धती (Bharatiya Prakritik Krishi Paddati) योजने अंतर्गत ३८,६७० हेक्टर क्षेत्रात येत्या खरिपापासून नैसर्गिक शेती केली जाणार आहे. येत्या ३ वर्षांसाठी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ८२.८२ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे.
बुंदेलखंड प्रांतात (Bundelkhand Region) गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक शेती (Natural Farming) केली जात आहे. तिला चालना देण्यासाठी ५००, १००० हेक्टर्सची क्लस्टर्स विकसित करण्यात येणार असल्याचेही योगी म्हणाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.