
कर्नाटक सरकार राज्यातल्या चार कृषी विद्यापीठात नैसर्गिक शेती (Natural Farming) करून बघणार आहे. प्रत्येक कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीतील कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीनं हा प्रयोग केला जाणार आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या अखत्यारीतील शेतजमिनींवर रासायनिक खतं,कीडनाशकं न वापरता शेती करून बघितली जाणार आहे.
बंगळुरू, धारवाड, रायचूर आणि शिवमोग्गा विद्यापीठा अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रांकडील प्रत्येकी १ हजार एकर शेतजमिनीत सती जी पिकं घेतली जातात तिथं हा प्रयोग होणार आहे. या शेतजमिनीत भातपीक, गहू, कडधान्य, भरडधान्य, फळं अन भाजीपाला घेणार आहेत.
एप्रिल ते मे दरम्यान ही लागवड होणार असल्याचं कृषी मंत्री बी.सी. पाटील यांनी सांगितलंय. ज्या भागात भौगोलिक परिस्थितीनुसार अन उपलब्ध पाण्यानुसार जी पिकं घेतली जातात त्याच पिकांची लागवड केली जाणार आहे.
या पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांच्या, कीडनाशकांच्या ऐवजी शेतात उपलब्ध संसाधनांचा वापर केला जाणार आहे. गायीचं शेण, निम, हिरवा पालापाचोळा इत्यादीपासूनची खतं, कीडनाशक वापरली जाणार असल्याचं पाटील म्हणालेत. हा प्रयोग यशस्वी झाला तर हे तंत्र राज्यभरातील शेतकऱ्यांना शिकवल जाणार असल्याचंही पाटील यांचं म्हणणं आहे.
शेतातल्या उपलब्ध संसाधनामुळं , रासायनिक खतं, कीडनाशकांच्या खरेदीचा खर्च वाचतो. म्हणजेच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होते, जमिनीची पोत सुधारते, असं राज्यातील कृषी संशोधकांनी सांगितलं आहे. रासायनिक खतं, कीडनाशकं वापरण्यापूर्वी भारतात नैसर्गिक शेतीच (Natural Farming) केली जात होती, तेंव्हा कुठं एवढं उत्पादन मिळत होतं ? रासायनिक खतांच्या वापरामुळंच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाल्याचं काही शेतकरी अन शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.