Natural Farming
Natural FarmingAgrowon

मध्य प्रदेशात ५ हजार गावांत नैसर्गिक शेती

रासायनिक खतांच्या अतिवापराने मातीचा कस कमी झाला आहे, पोत बिघडला आहे, त्यामुळे रासायनिक खतांच्या वापरावर मर्यादा आणण्याची गरज असल्याचे सांगत चौहान यांनी राज्य सरकार नैसर्गिक शेतीला (Natural Farming) चालना देणार असल्याचे म्हटले आहे.
Published on

येत्या जूनपासून राज्यात ५२०० गावांमध्ये नैसर्गिक शेती (Natural Farming) करण्यात येणार असल्याची माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. या शेतकऱ्यांना देशी गायींच्या पालनासाठी राज्य सरकारकडून दरमहा अनुदानही देण्यात येणार असल्याचे चौहान म्हणाले आहेत.

Natural Farming
हिमाचलमध्ये ५० हजार एकर क्षेत्रात नैसर्गिक शेती !

सोमवारी (दिनांक २५ एप्रिल) 'इन्नोव्हेटिव्ह ॲग्रीकल्चर थ्रू व्हर्च्युअल मोड' या विषयावरील परिसंवादात चौहान बोलत होते. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे राज्यातील विविध पिकांचे उत्पादन वाढले आहे. मात्र त्यांच्या अतिवापराचे दुष्परिणामही आपण भोगत असल्याचे चौहान यांनी सांगितले आहे.

रासायनिक खतांच्या अतिवापराने मातीचा कस कमी झाला आहे, पोत बिघडला आहे, त्यामुळे रासायनिक खतांच्या वापरावर मर्यादा आणण्याची गरज असल्याचे सांगत चौहान यांनी राज्य सरकार नैसर्गिक शेतीला (Natural Farming) चालना देणार असल्याचे म्हटले आहे.

Natural Farming
कर्नाटकात होणार नैसर्गिक शेतीचा प्रयोग !

नैसर्गिक शेती हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. नैसर्गिक संसाधनांचा खते म्हणून वापर केल्यास जमिनीतील कार्बनचे प्रमाण नक्की सुधारेल. राज्य सरकारने नैसर्गिक शेतीसाठी (Natural Farming) स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी एक टास्क फोर्सही स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नर्मदा नदीपात्रालगतच्या परिसरात नैसर्गिक शेती (Natural Farming) करण्यात येणार असून राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे चौहान म्हणाले आहेत.

नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक खतांच्या निर्मितीतील गायीचे शेण आणि मूत्र यांचे महत्व लक्षात घेता संबंधित शेतकऱ्यांना देशी गायीच्या पालनासाठी ९०० रुपये दरमहा अनुदान देण्यात येणार असल्याचेही चौहान यांनी नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com