Cotton Sowing : कापूस लागवड पावसाअभावी रखडली

Rain Update : जून महिना संपत संपला तरी खानदेशात पुरेसा पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. बागायतदार शेतकऱ्यांनी ९० टक्क्यांवर पूर्वहंगामी कापसाची पेरणी केली.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon
Published on
Updated on

१) धरणातून हजारो ब्रास गाळाचा उपसा (Galmukat Dharan)

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत नंदूरबार जिल्ह्यातील जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील धरणातून काढण्याला शासनाने परवानगी दिल्यानंतर आजपर्यंत शेकडो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून हजारो ब्रास गाळ शेतात टाकण्यात आला. यातून उत्पादन भरघोस येईल व धरणात पाणीसाठा ही मुबलक होईल.

जिल्ह्यातील दिवसेंदिवस कमी होत जाणारे पर्जन्यमान, २०१० ते २०१९ पर्यंतच्या दशकात सरासरी ८८८ मिलिमीटर एवढे झाल्याची नोंद पाहता, त्यातून खरीप शेतीत होणारी वाढ व शेती, उत्पन्नात होणारी घट यावर उपाय म्हणून पावसाचे पाणी जिरवण्यासाठी कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे.

२) कृषी सहायकांची १९१ पदे रिक्त (Agriculture Dpeartment)

खरीप हंगामात कृषी विभाग महत्त्वपूर्ण काम करतो. मात्र काही वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात कृषी विभाग निम्मा रिकामा आहे. एकूण १ हजार ५१ पदे मंजूर असताना, केवळ ५२६ पदे भरली आहेत. ५४५ पदे म्हणजेच अर्धा विभागच रिक्त आहे.

काही भागांत तालुका कृषी अधिकारीच नाही. १९१ पदे कृषिसेवक, कृषी सहायकांची रिक्त आहेत. यामुळे कृषी विभाग सलाइनवर असल्याचे चित्र आहे. खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर अतिवृष्टी झाल्यास पंचनामे करण्यास कृषी सहायक, कृषिसेवकांची गरज भासते. खत, बियाण्यांच्या काळ्या बाजारावर ते लक्ष ठेवतात.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन वा अन्य मदतीला हेच पुढे असतात. ग्लोबल वार्मिंगमुळे आता हिवाळा, उन्हाळ्यातही अतिवृष्टी होते. त्या नुकसानीचे पंचनामे करण्यास लागलीच त्यांना कंबर कसावी लागते. तेव्हा कोठे पंचनाम लवकर होतात.

Cotton Cultivation
Cotton Production : कापूस उत्पादनवाढीचे महत्त्वाचे मुद्दे

३) धुळे जिल्ह्यात पावसाअभावी कोट्यवधींची उलाढाल ठप्प (Dhule Rain)

पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात खते, बियाण्यांची सुमारे शंभर कोटींहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांसह व्यावसायिक कमालीचे चिंतेत असून, गेल्या पंधरा दिवसांपासून कृषी क्षेत्राशी निगडित बाजारपेठेत शांतता आहे.

कृषी निविष्ठांचा साठा आहे, परंतु उठाव नसल्याने व्यावसायिक चिंताक्रांत असून, यंदाचा खरीप हंगाम पुढे ढकलला जात असल्याचे चित्र आहे. जून सरण्यास अवघा आठवडा शिल्लक आहे.

तरीही वरुणराजाची कृपादृष्टी नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत, तर ज्यांनी पेरण्या केल्या त्यांची पिके वाचविण्याची धडपड सुरू आहे. परिणामी, खते, बियाणे, कीटकनाशके बाजारातील उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह विविध व्यावसायिकांना पावसाची प्रतीक्षा आहे.

४) राज्यावर पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट (Sowing Update)

महाराष्ट्रात यंदा माॅन्सून उशिरा आला. मागील पाच दिवसांपासून पाऊस पडत असला तरी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये अजूनही अपेक्षित जोर नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

२८ जूनपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद एकट्या भंडारा जिल्ह्यात झाली, तर २० जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत अत्यल्प, १३ जिल्ह्यांत कमी, तर २ जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढाच पाऊस झाल्याची नोंद आहे. राज्यात जूनमध्ये ५६ टक्के तूट होती.

पण कमी पावसावर अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण जोरदार किंवा पोषक पाऊस झालाच नाही. त्यामुळे बहुतांशी भागातील पेरण्या उलटण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Cotton Cultivation
Cotton Market : कापूस दरात १०० रुपयांची सुधारणा; वायद्यांमध्ये आठवड्याच्या शेवटी मोठी वाढ

५) खानदेशात कापूस लागवड कमी होण्याची शक्यता (Cotton Cultivation)

जून महिना संपत संपला तरी खानदेशात पुरेसा पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. बागायतदार शेतकऱ्यांनी ९० टक्क्यांवर पूर्वहंगामी कापसाची पेरणी केली, पण कोरडवाहू शेतकरी दहा टक्के पेरण्या कमी करतील, असे चित्र सध्या आहे. पाऊसच नाही, तर बी परणार कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे.

मागील हंगामातील अजून १० ते १५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. पाऊस लांबल्यान शेतकऱ्यांचे डोळ आता आकाशाकड लागल आहेत. खानदेशात साडेआठ लाख हेक्टरवर कापूस लागवड होईल. ही लागवड सुमार २५ हजार हेक्टरने कमी होईल, असा अंदाज तूर्त आहे.

जळगाव जिल्ह्यातील लागवड पाच लाख ५० हजार हेक्टरवर राहू शकते. मागील हंगामात ही लागवड पाच लाख ६७ हजार हेक्टर एवढी होती. तसेच धुळे व नंदुरबारातील क्षेत्रही सुमारे १० ते १२ हजार हेक्टरने कमी होईल, असे दिसत आहे. नव्या अंदाजानुसार धुळ्यात दोन लाख तर नंदुरबारात एक लाख हेक्टरवर कापूस लागवड होऊ शकते.

पाऊस लांबल्याने उडीद, मुगाचा पेरा आता अतिशय कमी होईल. कापसाचा पेराही दहा टक्क्यांनी घटण्याची चिन्हे आहत. परिणामी खरिपाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम उशिराचा पाऊस करेल, असा अंदाज शेतीतज्ज्ञ व्यक्त करीत आहत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com