Tur Market : व्यापाऱ्यांचा म्यानमारमध्ये तुरीचा स्टाॅक?

देशात तूर आणि उडदाच्या दरात तेजी आहे. सरकार मात्र दर कमी करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करतंय. स्टाॅकमधील माल बाजारात आणण्यासाठी सरकार व्यापारी आणि स्टाॅकिस्ट तसचं प्रक्रियादारांवर दबाव टाकतंय.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on
Updated on

Tur Rate Update : देशात तूर आणि उडदाच्या दरात (Tur Rate) तेजी आहे. सरकार मात्र दर कमी करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करतंय. स्टाॅकमधील माल बाजारात आणण्यासाठी सरकार व्यापारी आणि स्टाॅकिस्ट तसचं प्रक्रियादारांवर दबाव टाकतंय. तर विदेशात भारतीय आयातरांनी केलेल्या स्टाॅकचीही चाचपणी सुरु आहे.

देशात सध्या तूर उडदाची टंचाई आहे. त्यामुळं जानेवारी ते मार्च या तिमाहीत तूर आणि उडदाच्या दरात मोठी वाढ झाली. व्यापारी, प्रक्रिया उद्योग आणि आयातदारांनी साठेबाजी करू नये यासाठी सरकारनं कठोर पावलही उचलली.

सरकार तूर आणि उडदाच्या स्टाॅकवर लक्ष ठेऊन आहे. तसेच उत्पादन, आयात आणि बाजारातील आवकेवर सरकारची नजर आहे. सरकार कुठल्याही परिस्थिती तूर आणि उडदाची साठेबाजी आणि नफेखोरीवर आळा आणण्याचा प्रयत्न करतंय.

त्यामुळेच तर सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांना आपल्याकडील साठ्याची अचूक माहिती देण्याची सूचना केली. त्यामुळं सरकारकडे माहितीही जमा होतेय.

Tur Market
Tur Market : सरकारकडे तुरीला पर्याय काय? दर पाडण्यासाठी सरकारचा आटापिटा

देशातील साठ्याची माहिती सरकारपुढे आली. त्यात काही त्रुटी असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण काही भारतीय आयातदारांनी म्याममारमध्ये तूर आणि उडदाचा स्टाॅक केल्याची माहिती सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही भारतीय आयातदारांनी आयातीचे सौदे केले. पण हा माल भारतात न आणता म्यानमारमध्येच स्टाॅक केला जातोय. देशातील दरात मोठी तेजी आल्यानंतर हा माल देशात आणून नफावसुली केली जाईल, असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

देशातील बाजारात सध्या तूर आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. तुरीला सध्या सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ते ८ हजार ८०० रुपयांच्या दर मिळतोय. तर उडादाचा भाव ७ हजार ते ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे.

तुरीने हंगामातील ९ हजार ३०० रुपयांचा टप्पा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच गाठला होता. तुरीच्या दरातील तेजीही मागील दोन महिन्यांपासून कायम आहे. बाजारातील आवकही कमी दिसते. रब्बीतील उडीद येण्यास आणखी काही काळ लागेल. तोपर्यंत उडदाच्या भावाताील तेजी टिकेल, असेही जाणकारांनी सांगितले.

Tur Market
Tur Market : देशातील बाजारात तुरीची आवक कमीच; बाजारभाव तेजीच

तूर आणि उडदाच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं सरकार विदेशातून आयातीसाठी होणाऱ्या सौद्यांवरही लक्ष ठेऊन आहे. सरकारला मिळालेल्या माहितीनुसार, काही भारतीय आयातदार कंपन्यांनी म्यानमारमध्ये तूर आणि उडदाचा स्टाॅक केला.

आयातदारांनी तुरीचा जवळपास १ लाख ५० हजार टन तर उडदाचा २ लाख टनांचा स्टाॅक केला आहे. त्यामुळे म्यानमारमधील भारतीय अधिकाऱ्यांना याची पडताळणी करण्याची सूचना करण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com