Tur Market : देशातील बाजारात तुरीची आवक कमीच; बाजारभाव तेजीच

देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. ऐन हंगामात तुरीच्या दरात वाढ झाल्यामुळं सरकारही ॲक्शन मोडमध्ये आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon

Tur Rate Update : देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. ऐन हंगामात तुरीच्या दरात वाढ झाल्यामुळं सरकारही ॲक्शन मोडमध्ये आहे. सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट, उद्योग आणि आयातदरांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली.

पण तरीही सरकरला तुरीचे दर करता आले नाहीत. तुरीचे दर सध्या ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

देशातील तुरीची काढणी आता पूर्ण झाली. पण बाजारातील तूर आवक नगण्य पातळीवर आहे. मागील काही दिवसांपासून आवक स्थिर दिसते. तर लग्नसराई आणि सण समारंभामुळे तुरीला चांगाल उठाव आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत.

यंदा देशातील तूर उत्पादनात मोठी घट झाली. उत्पादन यंदा ३२ लाख टनांच्या आतच्या राहण्याचा अंदाज आहे. पण देशातील लागवड कमी झाल्यापासूनच तुरीच्या दरात तेजी आली. गेल्या हंगामात तुरीचे भाव हमीभावापेक्षा कमी होते. पण लागवडी जशी कमी झाली तसे तूर भावाने उभारी घेतली.

Tur Market
Tur Market : तुरीचा बाजार तेजीत राहील, की दबावात येईल?

देशातील तूर दर सध्या ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीचे दर ऐन हंगामात तेजीत आल्याने सरकारही बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सरकारने तुरीचे दर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु केल्या.

पुढीलवर्षी लोकसभेसह काही राज्यातील निवडणुका आहेत. त्यामुळे सरकार ग्राहकांना खूश करण्यासाठी शेतीमालाचे भाव दबावातच ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी सरकार व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि उद्योगांवर दबाव आणत आहे.

सरकारच्या दबावामुळं उद्योग आणि स्टाॅकीस्टही गरजेप्रमाणं काम करत आहे. पण बाजारातील आवकच कमी असल्यानं दबाव नाही.

उद्योगांच्या गरजेएवढाच पुरवठा सध्या बाजारात दिसतो. त्यामुळं आवकेचा दबाव आला नाही. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी तुरीचे भाव पुढील काळातही तेजीतच राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशातील काही बाजारांमध्ये सध्या ९ हजारांपेक्षा जास्त दर मिळत आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातील ग्राहक बाजारातच तुरीचे दर वाढलेले आहेत. त्यामुळं इतर बाजारांमध्ये दरवाढ कायम आहे. यंदा सरकारला आयात करूनही गरज पूर्ण करता येणार नाही.

कारण आयातीला मर्यादा आहेत. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची उपलब्धता कमीच असते. त्यामुळं सरकारला तुरीचा पुरवठा वाढवता येणार नाही. तसचं स्टाॅक लिमिट लावले तरी जास्त दिवस बाजारावर परिणाम दिसणार नाही, असे जाणकारांनी सांगितले. एकूणच काय तर यंदा तुरीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com