Soybean Sowing : देशातील अपारंपरिक क्षेत्रात सोयाबीन लागवड विस्तारणार

देशात सोयाबीन लागवडीत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान ही तीन राज्ये आघाडीवर आहेत. त्यातील मध्य प्रदेशात सर्वाधिक ५८ लाख ५४ हजार, महाराष्ट्र ४२ लाख २१ हजार तर राजस्थानमध्ये ११ लाख हेक्‍टर क्षेत्र आहे.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

नागपूर ः पारंपरिकसोबतच देशातील विविध अपारंपरिक राज्यांमध्ये सोयाबीन लागवडीकरिता बियाणे (Seed For Soybean Sowing) व पूरक तंत्रज्ञानाची मागणी होऊ लागली आहे. त्यामध्ये आसाम आघाडीवर असून बोडो लँडवर येत्या पाच वर्षांत सुमारे १४ हजार हेक्‍टरपर्यंत सोयाबीन लागवड (Soybean Cultivation) क्षेत्र विस्तारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासोबतच पंजाब, हरियाना या राज्यांमध्येदेखील सोयाबीनला शेतकऱ्यांची वाढती पसंती (Farmers Demand For Soybean) असल्याची माहिती इंदूर येथील सोयाबीन संस्थेच्या सूत्रांकडून देण्यात आली.

Soybean
सोयाबीन पेरणीवेळी घ्यावयाची काळजी

देशात सोयाबीन लागवडीत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान ही तीन राज्ये आघाडीवर आहेत. त्यातील मध्य प्रदेशात सर्वाधिक ५८ लाख ५४ हजार, महाराष्ट्र ४२ लाख २१ हजार तर राजस्थानमध्ये ११ लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यात सरासरी एक लाख हेक्‍टर इतके मर्यादित क्षेत्र आहे. येत्या काळात कर्नाटकसोबतच बिहार, उत्तर प्रदेश, तमिळनाडू या राज्यांचादेखील सोयाबीनकडे वळण्याचा प्रस्ताव आहे. त्या दृष्टिने त्यांच्याकडून इंदूर येथील केंद्रीय सोयाबीन संशोधन संस्थेशी संपर्क साधला जात आहे. तमिळनाडूमध्ये पोल्ट्री व्यवसाय विस्तारत आहे.

Soybean
कर्नाटकात सूर्यफूल, सोयाबीन लागवडीस प्राधान्य; तूर,उडदाचे क्षेत्रही वाढले

सोयाबीन पेंडचा पोल्ट्रीफिडमध्ये वापर होतो. सध्या इतर राज्यांतून सोयाफिड आणावे लागते; मात्र याच भागात लागवड झाल्यास ते या व्यवसायासाठी फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळेच तमिळनाडू सरकार या पिकाच्या लागवडीवर भर देणार आहे. पंजाब मध्ये २ हजार हेक्‍टरपर्यंत क्षेत्र विस्तारले असून त्यांच्याकडून बियाणे मागणी वाढली आहे. हरियाना राज्यात सध्या क्षेत्र नसले तरी या वर्षी हरियाना सरकार २० प्रथम रेषीय प्रात्यक्षिक घेणार आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत सोयाबीन पिकाविषयी जागृती केली जाईल. त्या सरकारच्या आग्रहावरून केंद्रीय सोयाबीन संस्थेच्या संचालिका डॉ. नीता खांडेकर यांनी त्या भागाला भेटही दिली.

Soybean
सोयाबीन, तूर पिकासाठी सुधारित पेरणी पद्धती काय आहे?

आसाममधील बोडो लँडवर यंदा पहिल्यांदा ५० हेक्‍टरवर सोयाबीन लावणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने क्षेत्र वाढवीत पाच वर्षांत ४० हजार हेक्‍टरवर नेण्याचा मानस तेथील सरकारचा आहे. त्याकरिता केंद्रीय सोयाबीन संस्थेसोबत झूम मीटिंगच्या माध्यमातून तांत्रिक संवाद साधत माहिती घेण्यात आली. त्यानंतर आसामचा कृषी विभाग, कृषी मंत्रालय व इतर अधिकारी, शेतकरी इंदूरला येऊन गेले. त्यांनी या पिकाविषयीचे बारकावे या भेटीत जाणून घेतले. मार्केटचे काय, असा प्रश्‍न या वेळी उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी सुरुवातीच्या काळात ग्रेन म्हणून विका, पुढील काळात लागवड क्षेत्र वाढल्यास प्रक्रिया उद्योग उभे आपोआप येतील, असा विश्‍वास त्यांना सोयाबीन संशोधन संस्थेच्या वतीने देण्यात आला.

पोषक घटकांच्या उपलब्धतेनुसार ठरणार हंगाम

सोयाबीन पिकाच्या पोषक वाढीत पाणी, तापमान, सूर्य प्रकाशाचे तास हे घटक सोयाबीन पिकात महत्त्वाचे ठरतात. या तीन पोषक घटकांची उपलब्धता संबंधित राज्यांत केव्हा होते त्यानुसार त्या-त्या राज्यांकरिता हंगाम ठरणार आहे. क्षारपड जमिनीत हे पीक घेण्यास अडचणीचे आहे.

इंडिया मॅपिंगद्वारे शोधणार नवे लागवड क्षेत्र अपारंपरिक क्षेत्रांचा शोध घेताना एनबीएसएस-एलयूपी संस्थेच्या माध्यमातून इंडियाचे मॅपिंग केले जाणार आहे. त्या आधारे देशाच्या विविध भागांत सोयाबीन लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. परंतु त्याआधी लागवडीसाठी लागणाऱ्या बियाणे व तत्सम निविष्ठांच्या उपलब्धतेकडेही लक्ष द्यावे लागेल. काही भागात सोयाबीन उत्पादनाचा हंगाम वेगळा राहील.
डॉ. नीता खांडेकर, संचालिका, केंद्रीय सोयाबीन संस्था, इंदूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com