कर्नाटकात सूर्यफूल, सोयाबीन लागवडीस प्राधान्य; तूर,उडदाचे क्षेत्रही वाढले

शेतकऱ्यांनी या खरिपात तेलबियांपैकी सूर्यफूल आणि सोयाबीनला प्राधान्य दिल्याचे दिसते. या खरिपात सूर्यफूल लागवडीचे क्षेत्र दुपटीने वाढून ५७ हजार हेक्टरवर गेले आहे.
Sunflower
SunflowerAgrowon
Published on
Updated on

वृत्तसंस्था

बंगळुरू: यंदाच्या खरिप हंगामात कर्नाटकातील शेतकऱ्यांनी तेलबिया (oil seeds) लागवडीस प्राधान्य दिले असून सोयाबीन (soyabean)आणि सूर्यफूल (sunflower) लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली. राज्यात कडधान्य लागवडीखालील क्षेत्रातही अपेक्षेप्रमाणे वाढ झाली असून शेतकऱ्यांनी तूर, उडदाला पसंती दिली.

कर्नाटकातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात कापूस,कडधान्य आणि तेलबिया लागवडीस पसंती दिली आहे. १० जुनपर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत कापूस, सूर्यफूल लागवड क्षेत्रात दुप्पट वाढ झाली तर कडधान्यापैकी तूर आणि हरभऱ्याचे लागवड क्षेत्र यंदा वाढले.

कर्नाटकच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार १० जूनपर्यंत १२.९७ लाख हेक्टर क्षेत्रात खरीपाच्या पेरण्या झाल्यात. गेल्यावर्षी याच कालावधीत ११.७३ लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या.

Sunflower
मॉन्सूनच्या हुलकावणीमुळे खरीपाच्या पेरण्या रेंगाळल्या

जानेवारी ते मे दरम्यान सरासरीच्या ९९ टक्के अधिक पाऊस झाला होता. यंदाच्या जूनमध्ये पहिल्या १० दिवसांत सरासरीपेक्षा १९ टक्के कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत चामराजनगर, मंड्या, हसन, चिक्कमंगळूर, तुमकूर, कोप्पल, रामनगर, म्हैसूर, चित्रदूर्ग आदी जिल्ह्यांत ३.१६ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्यात. या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी कापसासोबतच सूर्यफूल, तीळ, उडीद, मूग, ज्वारी या पिकांना पसंती दिलीय.

या खरिपात राज्यातील कापूस (Cotton) लागवड क्षेत्रात वाढ झाली. १० जूनपर्यंत १.२१ लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत केवळ ५९ हजार हेक्टर क्षेत्रात कापूस घेण्यात आला होता. चामराजनगर, हवेरी आणि गदग या जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी कापसाच्या लांब धाग्याच्या वाणाला पसंती दिली आहे.

राज्यातील कडधान्य लागवडीखालील क्षेत्रातही अपेक्षेप्रमाणे वाढ झाली. गेल्यावर्षीच्या २.६६ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा कडधान्य लागवडीखालील क्षेत्र ३.३३ लाख हेक्टरवर गेले आहे. गेल्यावर्षी ४८ हजार हेक्टरवर तूर घेण्यात आली होती. यंदा तूर लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊन ते ६७ हजार हेक्टरवर गेले आहे.

Sunflower
मसाला उद्योगाने 'ब्रँड इंडिया'वर भर देण्याची गरज

तूरीप्रमाणेच उडीद लागवडीखालील क्षेत्रातही वाढ झाली. गेल्यावर्षीच्या १.३९ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा १.८२ लाख हेक्टर क्षेत्रात उडदाची लागवड करण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत २.११ लाख हेक्टर क्षेत्रात मक्याची लागवड करण्यात आली होती. यंदा हे क्षेत्र घटून २.०२ लाख हेक्टरवर आले.यंदा कर्नाटकातील तृणधान्य लागवड क्षेत्रात घट दिसून आली. गेल्यावर्षी ३.७८ लाख हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याची लागवड करण्यात आली होती. यंदा हे क्षेत्र २.७० लाख हेक्टरवर गेलेय.

शेतकऱ्यांनी या खरिपात तेलबियांपैकी (oil seeds) सूर्यफूल (sunflower) आणि सोयाबीनला (soyabean) प्राधान्य दिल्याचे दिसते. या खरिपात सूर्यफूल लागवडीचे क्षेत्र दुपटीने वाढून ५७ हजार हेक्टरवर गेले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत केवळ २९ हजार हेक्टर क्षेत्रात सुर्यफुलाची लागवड करण्यात आली होती. ४७ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आलीय,गेल्यावर्षी हे प्रमाण ३६ हजार हेक्टरपुरते मर्यादित होते. भुईमूग (Groundnut) लागवड क्षेत्रात (२६ हजार हेक्टर) मात्र कसलाही फरक पडलेला नाही.

राज्यातील ऊस (Sugarcane) लागवड क्षेत्रात मात्र किंचित घट दिसून आली.गेल्या वर्षीच्या ३.६६ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत या खरिपात ३.५४ लाख हेक्टरवर ऊस घेण्यात आला. तंबाखू लागवडीखालील क्षेत्र ६४ हजार हेक्टरवरून ७१ हजार हेक्टरवर गेले.

कर्नाटकला तृणधान्य लागवडीखालील ३५.९८ लाख हेक्टर क्षेत्राकडून ९७.६१ लाख टन उत्पादनाची अपेक्षा आहे. २२.७७ लाख हेक्टर क्षेत्रावरील लागवडीतून १७.१९ लाख टन कडधान्याचे उत्पादन गृहीत धरले आहे. राज्याने ९.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबिया (oil seeds) लागवडीचे आणि ७.२८ लाख हेक्टर क्षेत्रात कापूस (cotton)लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com