Tur Market
Tur MarketAgrowon

Tur Market : तुरीचे दर पाडण्यात सरकार यशस्वी होईल का?

जगात भारत तुरीचा मुख्य ग्राहक आहे. भारतात यंदा उत्पादन घटल्याने निर्यातदार देशांनीही दर वाढवले.

Tur Price : उत्पादनात फटका बसल्यानं यंदा तुरीला चांगला भाव (Tur Rate) मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. पण सरकार तुरीचे दर कमी करण्यासाठी काहीही करू शकते, हे सरकारनं आयातीचे नियम बदलून आणि आयात शुल्क काढून दाखवून दिले.

पण आंतरराष्ट्रीय बाजारात (international market rate in tur) वाढलेले दर आणि देशातील घटलेले उत्पादन यामुळे दर तेजीतच राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

शेतीमाल बाजारात सध्या तुरीची चर्चा आहे. कारण इतर शेतीमालांच्या दरात चढ उतार सुरु आहेत. तर ऐन हंगामात तुरीच्या दरात तेजी आहे. सध्या तुरीला चांगला दर मिळत असला तरी उत्पादन घटल्यानंं शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलं.

राज्यातील अनेक भागात तुरीचं उत्पादन ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं शेतकऱ्यांनी कळवलं. त्यामुळं वाढलेल्या दरातून फार फायदा होत असून उत्पादन खर्च वसूल होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

Tur Market
Soybean, Tur Market : सरकार तूर, सोयाबीन उत्पादकांच्या मुळावर; सरकारच्या निर्णयाने आयात वाढणार

सरकारला मात्र शेतकऱ्यांच्या अर्थकारण काही पडलं नाही. तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकारनं कंबर कसली. तुरीचे दर पाडण्यासाठी सरकार कोणताही निर्णय घेऊ शकतं, अशी चर्चा बाजारात आहे. याची सुरुवातही झाली.

सरकारनं आधी तूर आयतीवरील १० टक्के शुल्क काढले. आता बंदरावर आयात तुरीला विनाविलंब क्लिअरन्स देण्याचे आदेश दिले. तसेच आपआपल्या राज्यातील स्टाॅकिस्ट आणि दालमिल्सकडील तुरीच्या साठ्याची माहिती देण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले.

आता आयात मालाची बंदरांवर केवळ नजरेने पाहणी होईल. त्यानंतर माल थेट गोदामांमध्ये जाईल. यामुळं देशात कमी दर्जाच्या तुरीसह इतर कडधान्याची आयात होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जातेय.

आंतरराष्ट्रीय बाजारातील दर

जगात भारत तुरीचा मुख्य ग्राहक आहे. भारतात यंदा उत्पादन घटल्याने निर्यातदार देशांनीही दर वाढवले. आंतरराष्ट्रीय बाजारातही तुरीचे दर तेजीत आले. म्यानमारची तूर मागील एक महिन्यापर्यंत ७ हजार रुपये प्रतिक्विंटलने मिळत होती.

मात्र आता म्यानमारची तूर सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार रुपयाने देशात आयात होत आहे. आफ्रिकेच्या तुरीचे भावही ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचले. याचाच अर्थ असा की तूर केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत आली.

Tur Market
Tur Rate : यंदा कसा राहील तुर बाजार ?

बाजारात काय स्थिती राहील?

देशातील तुरीचे घटलेले उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले दर यामुळे भारतातील तुरीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे. भारताने तूर आयात केली तरी दर कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यातच शेतकऱ्यांनी माल रोखला.

त्यामुळं सरकारनं स्टाॅक लिमिट लावले तरी ते शेतकऱ्यांना लागू होणार नाही. शेतकऱ्यांनी विक्री मर्यादीत ठेवल्यास सराकरने कोणताही निर्णय घेतला तरी दरावर फक्त काही काळ परिणाम होईल. दर पुन्हा तेजीत येतील.

यंदाच्या हंगामात तुरीला सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची विक्री बाजाराचा आढावा घेऊनच टप्प्याटप्प्याने करावी, असे आवाहन तूर बाजारातील अभ्यासकांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com