Team Agrowon
यंदा देशात तुरीचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे.
केंद्र सरकार आयात करून देशातील उपलब्धता वाढविण्यासाठी १० लाख टन तूर आयात करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
मात्र, ८.५ लाख टनांपेक्षा जास्त तूर आयात होण्याची शक्यता कमीच असल्याचे व्यापारी आणि उद्योगाचे म्हणणे आहे.
मागील हंगामातील तुरीचा साठा कमी असल्याने यंदा तुटवडा जाणवणार असल्याचे व्यापारी सांगतात.
यंदाच्या हंगामात चांगला दर मिळण्याच्या आशेने शेतकरी तुरीची मर्यादीत विक्री करत आहेत.
सध्या बाजारातील तुरीची आवक सरासरीपेक्षा कमी असून सरकार केव्हाही बाजारात हस्तक्षेप करण्याच्या शक्यतेने उद्योग गरजेप्रमाणे खरेदी करत आहेत.