Soybean Market : सोयाबीन हंगामाची अडखळत सुरुवात

Soybean Season : मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या आघाडीच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये यंदा सोयाबीनचा हंगाम लांबला आहे. दरवर्षी एव्हाना महाराष्ट्रात सांगली भागात सोयाबीन आवक बऱ्यापैकी झालेली असते.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Soybean Rate : मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या आघाडीच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये यंदा सोयाबीनचा हंगाम लांबला आहे. दरवर्षी एव्हाना महाराष्ट्रात सांगली भागात सोयाबीन आवक बऱ्यापैकी झालेली असते. परंतु यंदा तेथेदेखील हंगाम १५-२० दिवस उशिराने सुरू होणार आहे. मात्र सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानमध्ये हंगाम नेहमीपेक्षा लवकर सुरू होईल. कारण या राज्यात पाऊस बरा झाला आणि तो नेहमीपेक्षा अगोदरच सुरू झाला होता. एकंदर गोळाबेरीज करता, पावसाने उघडीप दिली, तर ऑक्टोबर १० तारखेपासून सोयाबीन हंगाम जोरात सुरू होईल.

मागील आठवड्यातील लेखात सोयाबीनच्या
नवीन हंगामाची सुरुवात कठीण राहील, असे नमूद केले होते. विक्रमी खाद्यतेल आयात हे सोयाबीन नरम राहण्यामागचे प्रमुख कारण राहील असे त्यात म्हटले होते. आठवड्याअखेरीस बाजारातील अहवाल असे दर्शवत आहेत की नवीन सोयाबीन बाजारात येऊ लागले असले तरी दरवर्षीपेक्षा आवक खूपच कमी आहे. त्याला अनेक कारणे आहेत. एक तर पेरण्या बहुतांशी उशिरा झाल्यामुळे हंगाम लांबणार आहेच. परंतु मध्य प्रदेशात गेल्या आठवड्यात बहुतेक भागांत पावसाचे प्रमाण खूपच वाढल्याने काढणी, वाहतूक या गोष्टींवर विपरीत परिणाम झाला आहे.
इंदूर बाजारात सुरुवातीला झालेल्या काही सौद्यांमध्ये सोयाबीनला ४२०० ते ४८०० रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला असल्याचे समजते. अर्थात, हा भाव म्हणजे बाजारकल असे मानणे अयोग्य असले तरी बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता पुढील निदान चार-सहा आठवडे ही कक्षा किंचित रुंदावू शकेल. भावपातळी ४२०० ते ५००० रुपयांची राहू शकते. मात्र सध्या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे काही गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहेत.

Soybean Market
Soybean : अमेरिका, भारतातील सोयाबीन हंगामाची स्थिती काय?

मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी आधी उष्णतेने आणि पाऊस नसल्यामुळे खराब झालेल्या सोयाबीन पिकाला आता ऐन काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु त्याच वेळी मोठ्या भागावर उशिरा लागवड झालेल्या सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ होणार नसली, तरी अपेक्षेपेक्षा कमी नुकसान होणार असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी एव्हाना महाराष्ट्रात सांगली भागात सोयाबीन आवक बऱ्यापैकी झालेली असते. परंतु यंदा तेथेदेखील हंगाम १५-२० दिवस उशिराने सुरू होणार आहे. मात्र या दोन राज्यांमधील हंगाम लांबणीवर पडला असला तरी सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानमध्ये हंगाम नेहमीपेक्षा लवकर सुरू होईल. कारण या राज्यात पाऊस बरा झाला आणि तो नेहमीपेक्षा अगोदरच सुरू झाला होता.

Soybean Market
Cashew Season : काजू हंगामाची सुरुवात निराशाजनक

एकंदर गोळाबेरीज करता, पावसाने उघडीप दिली, तर ऑक्टोबर १० तारखेपासून सोयाबीन हंगाम जोरात सुरू होईल. त्या वेळी बाजार वरील कक्षेच्या मध्यावर येईल. याला अजून एक कारण म्हणजे किमती पाच हजार रुपयांवर जातील तेव्हा मागील हंगामातील सोयाबीनदेखील विक्रीसाठी बाजारात येऊ शकते.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन १३ डॉलर खाली घसरले आहे. तसेच अमेरिकेत सोयाबीन काढणीने वेग घेतला असल्यामुळे सोयामिल आणि सोयातेलदेखील दबावाखालीच राहिले आहे. भारताची सोयापेंड निर्यात तिप्पट झाली असली तरी सध्याची निर्यात किंमत सोयाबीन पाच हजार रुपयांपलीकडे नेऊ शकेल एवढी सशक्त नाही. किंबहुना, सोयाबीन पाच हजारांच्या पलीकडे गेल्यास ही निर्यात मंदावू लागेल, अशीच शक्यता जास्त आहे.

सोपा या सोयाबीन प्रक्रियादार संघटनेच्या म्हणण्यानुसार सोयाबीन क्षेत्रात चार ते सहा टक्के वाढ झाली असली तरी उत्पादकतेत घट होणार आहे. परंतु सप्टेंबरमधील पाऊस किती लाभदायक ठरेल हे लवकरच समजेल. त्यामुळे सोयाबीन उत्पादन साधारणपणे मागील वर्षाप्रमाणेच राहील असे म्हटले जात आहे. तर भारतीय हवामान खात्याने मोसमी पाऊस ऑक्टोबरपर्यंत माघारी जाणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे. ते रब्बी पिकांसाठी लाभदायक ठरेल, परंतु ऑक्टोबरमध्ये खरीप पिकांच्या काढणी हंगामावर अनिश्‍चिततेचे  
सावट निर्माण करणार आहे. मागील दोन-तीन वर्षांत खरीप आणि रब्बी हंगामात काढणीला आलेल्या पावसाने बरेच नुकसान होताना आपण पाहिले आहे. अनेकदा शेतीमालाच्या वजनात फार नुकसान झाले नाही तरी दर्जा खराब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. यंदा तसे न होवो ही अपेक्षा.  या पार्श्‍वभूमीवर येत्या शनिवार-रविवारी मुंबईत ग्लोबॉइल-२०२३ ही दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. या निमित्ताने अनेक देशांमधील प्रसिद्ध विश्‍लेषक, व्यापारी, मार्केट इंटेलिजेंस सेवा पुरवठादार आपली मते मांडतील. तसेच तेलबिया आणि खाद्यतेलाचे बाजारकल याबाबत तिथे चर्चा होईल. त्यातून जागतिक बाजारातील परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.  

जगभरात अनेक पिकांचा नवीन हंगाम सुरू झाल्यामुळे आधीच नरम झालेल्या कमोडिटी बाजारात मंदी येण्यासाठी अजून एक कारण निर्माण झाले आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँकेने मागील आठवड्यातील बैठकीत व्याजदर वाढ स्थगित केली असली तरी पुढील काळात एक किंवा दोन दरवाढी कराव्या लागतील असे म्हटल्यामुळे अमेरिकी डॉलर अधिक मजबूत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाही म्हणता याच परिस्थितीमुळे रुपया आजवरच्या सर्वांत खालच्या पातळीवर घसरल्याने शेतीमाल बाजारभाव स्थिर राहण्यास मदत मिळत
आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com