Sitafal Market : ऐन सीताफळ हंगामात ४० कोटींचा तोटा

Sitafal Market Rate : मागील काही वर्षे सीताफळ हंगामात ५० टक्के माल क्रमांक एकच्या प्रतीचा असायचा. तर दुसऱ्या प्रतीचा माल ३० टक्के आणि तिसऱ्या प्रतीचा किंवा भुगी प्रकारचा माल २० टक्के मिळत होता.
Sitafal Market
Sitafal MarketAgrowon

Pune News : पुरंदर तालुका हे सीताफळाचे आगार आहे. परंतु यंदा उन्हाळा तीव्र होता. त्यामुळे सीताफळाच्या आगाप (उन्हाळी) बहराचे उत्पादन तुलनेत फुलधारणेच्या वेळीच्या तापमानवाढीने परागीभवन कमी राहिले म्हणून उत्पादन कमी आहे. फळाचा आकारही कमी राहिला आहे.

तालुक्यात पाऊस कमी असल्याने फळवाढीला लगाम बसला. दुसरीकडे सीताफळाचे बाजारभावही तुलनेत पडले आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत कसेबसे १५ ते २० कोटी रुपये उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले. मात्र हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांतच ४० कोटी रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना झाला आहे.

मागील काही वर्षे सीताफळ हंगामात ५० टक्के माल क्रमांक एकच्या प्रतीचा असायचा. तर दुसऱ्या प्रतीचा माल ३० टक्के आणि तिसऱ्या प्रतीचा किंवा भुगी प्रकारचा माल २० टक्के मिळत होता. आता निम्मा माल तिसऱ्या क्रमांकाचा म्हणजेच भुगी प्रकारातील मिळतोय. क्रमांक एक प्रतीचा माल अगदी १० ते १५ टक्केच मिळतोय.

Sitafal Market
Custard Apple Cultivation : सीताफळाची लागवड कशी करावी?

बाकी दुसऱ्या क्रमांकाच्या प्रतीचा माल ३० ते ३५ टक्के मिळतोय. त्यामुळे सीताफळाचे दरही ३०० ते १८०० रुपये २० किलोच्या क्रेटमागे जेमतेमच आहेत, असे व्यापारी म्हस्कू खेडेकर, गिरीश काळे, किशोर काळे, सिद्धू खेडेकर, अजित पोमण, नीलेश टिळेकर, मनीष सोंडकर, शौकत भाई, विठ्ठल काळे, नितीन काळे आदींनी सांगितले.

उत्पादक शेतकरी बाळासाहेब टिळेकर, शंकर झेंडे, रामचंद्र खेडेकर, मुरलीधर झेंडे यांनी या निमित्ताने चांगल्या पावसाच्या व सीताफळ उत्पादन वाढीसह दर सुधारण्याच्या आशा आहेत, असे सांगितले.

Sitafal Market
Sitafal Lagwad: सीताफळ लागवडीचं नियोजन कसं कराल =?

सीताफळाचे गणित...

- पुरंदर तालुक्यातील सीताफळ क्षेत्र ः ५,५०० एकर

- एकरी झाडे १६०

- झाडांची संख्या ः ८ लाख ८० हजार

- एकरी झाडे १६०

- सरासरी दर ४० ते ६० रुपये किलो

- तालुक्याचे आर्थिक उत्पन्न ः १३२ कोटी रुपये किमान

फळांचा आकार व उत्पादन कमी का.?

- सीताफळात उन्हाळी (आगाप) बहर धरला, त्यास उन्हाळ्यातील तापमान वाढीने गाठले

- उन्हाळी बहरात तापमानाने आद्रर्ता कमी राहिली

- परागीभवन अपेक्षित झाले नाही

- फुले गळ झाली, फळांची संख्या कमी झाली

- जूनच्या पंधराव्यापर्यंत तापमान उच्च

- फळांची वाढ होण्याला वळवानंतर पावसाची जोड लाभली नाही

- सिंचनास अपेक्षित पाणी मिळाले नाही

विविध ठिकाणांचे दर

- सासवड (ता. पुरंदर) घाऊक बाजार ः १५ ते ९० रुपये किलो

- पुणे ः १५ ते ८० रुपये किलो

- वाशी (नवी मुंबई) ः २० ते ८० रुपये किलो

- परप्रांतात ः (दिल्ली व इतर) ः ४० ते १५० रुपये किलो

सीताफळातील फळे दहा टक्के प्रक्रिया उद्योगात जातात. तिथे पल्प (गर) काढला जातो. तालुक्यातील प्रक्रिया उद्योगात एकूण उत्पादनातील २५ टक्के भुगी माल १५ ते २० रुपये किलो दराने उचलतात. मात्र भुगी माल ४० ते ४५ टक्के मिळतोय. त्यामुळे उत्पन्न घटले.
- माउली मेमाणे, संचालक, राज्य सीताफळ उत्पादक व संशोधन संघ
सध्या पाऊस कमी असला तरी भीजपाऊस आहे. तो सीताफळाच्या मृग बहरास चांगला आहे. आर्द्रता परागीभवनासाठी ८० लागते, ती ९५ टक्के आहे. त्यामुळे पुढे फळांचा आकार व उत्पादन वाढेल, असा अंदाज आहे.
डॉ. प्रदीप दळवे, उद्यान विद्या वेत्ता, अंजीर, सीताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी, ता. पुरंदर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com