Sitafal Lagwad: सीताफळ लागवडीचं नियोजन कसं कराल =?

Team Agrowon

अल्‍कलीयुक्‍त जमीन टाळा

खडकाळ, रेताड जमिनीत सीताफळ चांगल्या प्रकारे वाढते. मात्र भारी,काळी, पाणी साठवून ठेवणारी अल्‍कलीयुक्‍त जमीन या पिकास अयोग्य आहे.

Sitafal | Agrowon

सीताफळाच्या जाती

बाळानगर : फळे आकाराने मोठी, गराची चव उत्तम, फळांना चांगला बाजारभाव मिळतो. या व्यतिरिक्त सीताफळाच्या अर्का सहान, फुले पुरंदर, फुले जानकी,मेमॉब, धारूर-३, ६ या जाती लागवडीसाठी योग्य आहेत.

Sitafal | Agrowon

शेणखत

लागवडीसाठी ५ x ५ मीटर किंवा ४ x ४ मीटर अंतरावर ०.६० x०.६० x ०.६० मीटर आकाराचे खड्डे करावेत. पावसाळ्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत १ ते १.५ घमेले , पोयटा माती २ ते ३ घमेले आणि १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत.

Sitafal | Agrowon

रोपे मध्यभागी लहान खड्डा

खड्डे भरल्यानंतर कलमे किंवा रोपे मध्यभागी लहान खड्डा करून लावावीत. काठीचा आधार द्यावा. पाऊस नसेल तर लगेच झारीने पाणी द्यावे.

Sitafal | Agrowon

ताण पडल्‍यास पाणी

रोपे लावल्‍यानंतर काही मेली असतील तर महिन्‍याच्या आत नांग्‍या भरून घ्‍याव्‍यात. तसे शक्‍य न झाल्‍यास पुढील वर्षी जून महिन्‍यापूर्वी नांग्‍या भराव्‍यात. खुरपणी करून बाग तणमुक्त ठेवावी. पावसाचा ताण पडल्‍यास मधून मधून पाणी द्यावे.

Sitafal | Agrowon

वाढीच्‍या काळात झाडाला योग्‍य वळण

सुरुवातीच्‍या वाढीच्‍या काळात झाडाला योग्‍य वळण द्यावे. त्यासाठी झाडावरील अनावश्‍यक फांद्या काढून टाकाव्‍यात. पावसाचा ताण जास्‍त पडल्‍यास १५ ते २० दिवसांनी पाणी द्यावे. बागेमध्‍ये वेळोवेळी आंतर मशागत करावी.

Sitafal | Agrowon

खोडापासून दूर

पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडास बहर धरताना ५० किलो चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्फुरद (१२५ ग्रॅम), पालाश (१२५ ग्रॅम) आणि नत्राची अर्धी मात्रा (१२५ ग्रॅम) खोडापासून दूर फांद्याच्या परिघाखाली रिंग करून द्यावी.

Sitafal | Agrowon
AI | Agrowon