Soybean Procurement : हमीभावाने ५ लाख १७ हजार क्विंटलवर सोयाबीनची खरेदी

Soybean Market : किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) दराने सोयाबीन खरेदीस गुरुवार (ता. ६)पर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Soybean Market
Soybean ProcurementAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) दराने सोयाबीन खरेदीस गुरुवार (ता. ६)पर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु उर्वरित चार दिवसांची मुदत नोंदणीकृत २४ हजारांवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी कमी पडणार आहे.

मुदतवाढ न दिल्यास असंख्य शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत शुक्रवार (ता. ३१) अखेरपर्यंत २४ हजार ९२३ शेतकऱ्यांचे ५ लाख १७ हजार ७६९ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आले आहे.

Soybean Market
Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीच्या नावावर शेतकरी वेठीस

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील किंमत आधार योजनेअंतर्गत १५ ऑक्टोबरपासून सोयाबीनची खरेदी सुरू झाली असून, एकूण ४९ हजार ७२४ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. नाफेडतर्फे परभणी जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी २३ हजार ८०३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी आहे.

आजवर १४ हजार ४३२ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन येण्याचे संदेश पाठविण्यात आले. त्यापैकी ७ हजार ७३३ शेतकऱ्यांचे १ लाख ६१ हजार ४०१ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आले. आजवर ११ केंद्रांवरच्या ३ हजार ७०४ शेतकऱ्यांना ७८ हजार १११ क्विंटल सोयाबीनचे ३८ कोटी २१ लाख २३ हजार ५६१ रुपये चुकारे अदा करण्यात आले.

Soybean Market
Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला मुदतवाढीची अपेक्षा

हिंगोलीतील १५ खरेदी केद्रांवर २५ हजार ९२१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आजवर २४ हजार ६९३ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर घेऊन येण्याचे संदेश पाठविण्यात आले. त्यापैकी १७ हजार १९० शेतकऱ्यांच्या ३ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली. सर्व १५ केंद्रांवरील ८ हजार शेतकऱ्यांना १ लाख ४७ हजा क्विंटल सोयाबीनचे ७१ कोटी ९७ लाख रुपयांवर चुकारे अदा करण्यात आले.

परभणी-हिंगोली जिल्हे हमीभाव सोयाबीन खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्र ठिकाण नोंदणीकृत शेतकरी सोयाबीन खरेदी शेतकरी संख्या

परभणी २६३२ ११००२ ४८२

पेडगाव १९६६ १८४८४ ९३७

झरी ३१६ ४७६ २६

वरपुड ५२८ ३५२८ १५६

बोरी २९३७ १३९१७ ७०४

जिंतूर १५६९ ६९६८ ४५२

सेलू ४५४६ २३८३६ १३०२

मानवत २०१३ ९०९६ ५१७

रुढीपाटी १०३१ १३४०१ ६४७

पाथरी १७०१ १८३२१ ९०९

सोनपेठ २१५९ ३१२४० १००८

पूर्णा २४०५ १११२७ ५९३

हिंगोली १९५१ २९२४१ १२४४

कन्हेरगाव १५८५ २७५९२ १०४८

कळमनुरी १९८६ २०३३६ १०२७

वारंगा ११९६ १३६७७ ६९५

वसमत २१२९ २३२६२ १२१९

जवळा बाजार २८७४ १८६६२ ११९२

येळेगाव १४५८ २४५९२ १२२४

सेनगाव १९२२ ४६९० १९९३

साखरा १२८४ १७०३५ ८००

शिवणी खुर्द १४११ १८१६६ ९८६

फाळेगाव २११६ २७२९७ १३३९

नागसिनगी १७९२ ३३०३८ १४७२

आडगाव २१४४ २८५८८ १५५०

उमरा ३९४ ५६८० २८९

पुसेगाव १६७९ २२३८७ १११२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com