Ethanol Market : तेल कंपन्यांबरोबर इथेनॉलचे ४९६ कोटी लिटरचे करार

देशातील इथेनॉल उत्पादकांनी तेल कंपन्यांबरोबर मार्चच्या मध्यापर्यंत ४९६ कोटी लिटर इथेनॉलचे करार केले आहेत. त्यापैकी १४९ कोटी लिटरची प्रत्यक्षात खरेदीही कंपन्यांनी केली आहे.
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon

Kolhapur News : देशातील इथेनॉल उत्पादकांनी (Ethanol Producer) तेल कंपन्यांबरोबर मार्चच्या मध्यापर्यंत ४९६ कोटी लिटर इथेनॉलचे करार केले आहेत. त्यापैकी १४९ कोटी लिटरची प्रत्यक्षात खरेदीही कंपन्यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशने सर्वाधिक ८२ कोटी लिटरचे, तर या खालोखाल महाराष्‍ट्राने ६७ कोटी लिटरचे करार केले आहेत.

डिसेंबर २२ ते ऑक्टोबर २३ अखेर ६०० कोटी लिटरची गरज इंधनामध्ये मिश्रण करण्यासाठी आहे. पेट्रोल मध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे देशाचे सरासरी प्रमाण ११.५३ टक्के इतके आहे.

यंदा केंद्राने इथेनॉल निर्मितीला प्रोत्‍साहन दिल्याने अनेक कारखाने इथेनॉल निर्मितीकडे वळले. पुरवठा केलेल्या १४९ कोटी लिटर पैकी ८२ कोटी लिटर इथेनॉल उसाच्या रसापासून तयार केले आहे. ४२ कोटी इथेनॉल बी हेवी मोलॅसिसपासून तयार केलेल्या इथेनॉलचे आहे.

Ethanol Production
Ethanol Production : पुढील वर्षासाठी इथेनॉलचा ‘कॅरी ओव्हर स्टॉक’

८२ कोटी लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी १२ लाख टन साखर वळविण्यात आली. ४२ कोटी इथेनॉलसाठी ३.३० लाख टन साखर वळविण्यात आली. १२ मार्चअखेर केलेल्या करारानुसार उसाच्या रसापासून तयार केलेल्या इथेनॉलचे करार १४२ कोटी लिटरचे, तर बी हेवी मोलॅसिसपासून तयार झालेल्या इथेनॉलचे करार २२० कोटी लिटरचे झाले आहेत.

मागणी वाढण्याची शक्‍यता

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे प्रमाण केंद्राकडून मोहीम पातळीवर वाढविण्यात येत आहे. २०२३-२४ मध्ये इथेनॉलची मागणी ५०० कोटींवरून ६०० कोटींवर पोचली आहे. २०२४- २५ पर्यंत ती ९०० लिटरपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.

ही संभाव्य मागणी पूर्ण करण्यासाठी नव्या विविध राज्यांमध्ये नवीन इथेनॉल प्रकल्प उभारण्यात येत आहेत. पश्‍चिम बंगालसह अन्य धान्य उत्पादक राज्यांमध्ये तांदूळ, खराब तांदूळ यावर आधारित प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

Ethanol Production
Ethanol Production : यंदाच्या हंगामात इथेनॉल उत्पादन वाढण्याची शक्यता

इथेनॉल करारांसह मागणीपुरवठा (१२ मार्चअखेर)

राज्य... झालेले करार(कोटी लिटर)...प्रत्यक्ष पुरवठा(कोटी लिटर)...कराराच्या तुलनेत पुरवठा (टक्के)...मिश्रणाचे प्रमाण (टक्के)

उत्तर प्रदेश...८२...२३...१६...११.८९

महाराष्ट्र...६७...१७...१२...११.८५

कर्नाटक...२९...१०...७...११.६९

बिहार...१८...२...२...११.८२

आंध्रप्रदेश...१७...६...५...११.७८

उत्तराखंड...३...१...१...११.८३

मध्यप्रदेश...१८...६...४...११.६२

विविध घटकांपासून तयार इथेनॉलचे करार, पुरवठा

घटक...केलेले करार(कोटी लिटर)...प्रत्यक्षातील पुरवठा(कोटी लिटर)

ऊस रस...१४१...८२.३३

बी हेवी मोलॅसिस...२२०...४२

सी हेवी मोलॅसिस...५...२

खराब धान्य...१९...४

जादा धान्य...१०९...१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com