
हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत (Hingli APMC) धान्य बाजारांमध्ये (भुसार मार्केट) शनिवारी (ता. ७) सोयाबीनची ९०० क्विंटल आवक (Soybean Arrival) होती. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५५११ रुपये तर सरासरी ५२०५ रुपये दर मिळाले.
हिंगोली धान्य बाजारात सोमवार (ता. २) ते शनिवार (ता. ७) या कालावधीत सोयाबीनची एकूण ४३५९ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला किमान ४९०० ते कमाल ५५९० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ६) सोयाबीनची ६९५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४९९० ते कमाल ५५०० रुपये, तर सरासरी ५२४५ रुपये दर मिळाले.
गुरुवारी (ता. ५) सोयाबीनची ६६० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५०५० ते कमाल ५४९० रुपये, तर सरासरी ५२७० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ४) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५०५० ते कमाल ५५८१ रुपये, तर सरासरी ५३१५ रुपये दर मिळाले.
मंगळवारी (ता. ३) सोयाबीनची ६९९ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५५७० रुपये, तर सरासरी ५२८५ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २) सोयाबीनची ६०५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५५९० रुपये, तर सरासरी ५२९५ रुपये दर मिळाले.
आवकेत फारशी वाढ नाही
सोयाबीन दरात चढ-उतार सुरूच आहेत. परंतु मागील काही आठवड्याच्या तुलनेत दरात थोडी सुधारणा झाली आहे. परंतु सहा हजार रुपयांची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यानी सोयाबीन अद्याप साठवूण ठेवलेले आहे. त्यामुळे धान्य बाजारातील सोयाबीनच्या आवकेत फारशी वाढ झालेली दिसत नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.