Jaggery Rate : सांगलीत गुळाला प्रतिक्विंटल ३२०० ते ४०२८ रुपये दर

येथील कृषी उ‍त्पन्न बाजार समिती गुळाची आवक कमी अधिक होत आहे. गतसप्ताहात गुळाची २८८७२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ३२०० ते ४०२८ रुपये असा दर होता.
Jaggery Rate
Jaggery RateAgrowon
Published on
Updated on

सांगली ः येथील कृषी उ‍त्पन्न बाजार (Sangli APMC) समिती गुळाची आवक कमी अधिक होत आहे. गतसप्ताहात गुळाची २८८७२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ३२०० ते ४०२८ रुपये असा दर होता दिवाळीनंतर बाजार समितीत नव्या गुळाची आवक सुरू होईल, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Jaggery Rate
Crop Damage : नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरवर जाण्याचा धोका

गतसप्ताहात परपेठ हळदीची १२६१ क्विंटल आवक झाली होती. गतसप्ताहापेक्षा चालु सप्ताहात १०३३ क्विंटलने हळद आवक वाढली होती. हळदीला प्रतिक्विंटल ४००० ते ८०३३ रुपये असा दर होतो. राजापूर हळदीची आवक ५९२ क्विंटल झाली होती. गतसप्ताहापेक्षा चालु सप्ताहात ११८ क्विंटलने आवक कमी झाली होती. हळदीस प्रतिक्विंटल ५००० ते ८१०० रुपये असा दर मिळाला होता. ज्वारी (शाळू)ची २०० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ४१०० हजार रुपये असा दर मिळाला.

वाटाणाची ६० क्विंटल आवक झाली होती. वाटाण्यास प्रतिक्विंटल ४५०० ते ५४०० रुपये असा दर मिळाला. बाजरीची ८१ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल २३५० ते २८५० रुपये असा दर होता. सोयाबीनची २२५ क्विंटल आवक झाली. गतसप्ताहापेक्षा चालु सप्ताहात सोयाबीनच्या आवकीत २५५ क्विंटलने घट झाली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल ४६६६ ते ५०८३ रुपये असा दर होता. मिरची, बेदाणा, यासह अन्य धान्याची आवक कमी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com