
Chandrapur News : शेतीपूरक दुग्ध व्यवसायावर (dairy business) मूल तालुक्यातील शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. नजीकच्या काळात या भागातील दूध संकलन (Milk collection) ८५० लिटरवर पोहोचले असून चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी मका लागवडीसाठी (Maize Cultivation) पुढाकार घेत आहेत. त्यातूनच यंदा मक्याखालील क्षेत्र २०० हेक्टरवर पोहोचले आहे.
पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हा देखील धान उत्पादनासाठी ओळखला जातो. त्याच्या जोडीला कपाशी, सोयाबीन यासारखे पीक घेतले जाते. पारंपरिक पिकांवर अवलंबिता असलेल्या या शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादनातही सातत्य ठेवले आहे.
सरासरी ८५० लिटर इतके दूध संकलन उसराळा, सिंदी, डोंगरगाव या गावातून होते. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांद्वारे उन्हाळ्यात पाण्याअभावी चारा लागवड अत्यल्प होत होती.
बहूतांशवेळा बाजारातूनच चाऱ्याची खरेदी करावी लागत असल्याने त्यांच्यासाठी हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरत होता. ही बाब लक्षात घेता मका लागवड व त्यापासून मुरघास निर्मितीला या भागात प्रोत्साहन दिले जात आहे.
कृषी विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षापर्यंत दहा हेक्टरपर्यंत असलेले मक्याचे क्षेत्र यंदा २०० हेक्टरपर्यंत विस्तारले आहे.
मक्यापासून मुरघास बनविले जात असून त्यासाठी खास प्लॅस्टिक पिशव्याचा पुरवठा आत्मा योजनेतून करण्यात आला आहे. मुरघास विषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे याकरिता नगर जिल्ह्यातून खास चार प्रशिक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.