Mango Festival : पणन मंडळाच्या आंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढाल

Mango Season : आंबा हंगाम सुरू झाला, की पुण्यातील ग्राहक महोत्सवाची वाट पाहत असतो. या वर्षी १ एप्रिलपासून महोत्सवाला प्रारंभ झाला.
Mango Festival
Mango FestivalAgrowon

Pune News : कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा ग्राहक मिळावा आणि ग्राहकांना कोकणातील अस्‍सल हापूस उपलब्ध व्हावा, या उद्देशाने राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आंबा महोत्सवाची सांगता झाली असून, दोन महिन्यांच्या महोत्सवाची १५ कोटी ५० लाखांची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.

कदम म्हणाले, ‘‘आंबा हंगाम सुरू झाला, की पुण्यातील ग्राहक महोत्सवाची वाट पाहत असतो. या वर्षी १ एप्रिलपासून महोत्सवाला प्रारंभ झाला. महोत्सवात ७० स्टॉल उभारण्यात आले होते. यापैकी १० स्टॉल जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटांना देण्यात आले होते.

Mango Festival
Mango Festival : बुलडाण्यातील आंबा महोत्सवात ४० प्रजाती; विक्रीही सुरू

आंबा महोत्सवामध्ये रत्नागिरी आणि देवगड येथून १११ आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. तर सोलापूर जिल्ह्यातील केसर आंबा उत्पादक शेतकरीदेखील होते. या महोत्सवात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यासह पायरी, बिटकी (लहान हापूस) प्रामुख्याने विक्री झाली. या वर्षी सुमारे अडीच लाख डझन आंब्याची विक्री झाली. यातून सुमारे १५ कोटी ५० लाखांची उलाढाल झाली.’’

Mango Festival
Mango Festival : सांगलीतील आंबा महोत्सवात ४ लाखांची उलाढाल

...असे राहिले दर

हंगामाच्या प्रारंभाला रत्नागिरी हापूसला ७०० ते ११००, तर देवगडला ५०० ते १ हजार रुपये दर राहिले. हेच दर हंगामाच्या शेवटी ४०० ते ६०० आणि ५०० ते ८०० रुपये राहिले, असे महोत्सवाचे समन्वयक आणि देशांतर्गत व्यापार आणि विकास विभागाचे सहाय्यक उपसरव्यवस्थापक मंगशे कदम यांनी सांगितले.

आंबा महोत्सव पणनचा ब्रॅण्ड

गेल्या २३ वर्षांपासून पणन मंडळाच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या आंबा महोत्सवामुळे शेतकरी आणि ग्राहकांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाले असून, शेतकऱ्यांना हक्काचा ग्राहक मिळाला आहे. यामुळे पणन मंडळाचा आंबा महोत्सव ब्रॅण्ड झाल्याचे पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com