Mango Festival : बुलडाण्यातील आंबा महोत्सवात ४० प्रजाती; विक्रीही सुरू

Mango Variety : मागील तीन वर्षांपासून येथे भरत असलेला आंबा महोत्सव आता दरवर्षी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनतो आहे.
Mango Festival
Mango Festival Agrowon

Buldana News : मागील तीन वर्षांपासून येथे भरत असलेला आंबा महोत्सव आता दरवर्षी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनतो आहे. यावर्षी शुक्रवारी (ता.१७) झालेल्या प्रदर्शनात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बुलडाणा कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंबा महोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात आंब्याच्या विविध ४० प्रजातींचे प्रदर्शन ठेवण्यात आले. या प्रदर्शन आणि विक्री महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Mango Festival
Mango Festival Kolhapur : कोल्हापुरात आंबा महोत्सव, कृषी पणन मंडळाकडून आयोजन

आंबा महोत्सवाचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या प्रदर्शनी उद्घाटन केले. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि नागरिकांना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी, यासाठी अजिंठा रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात शुक्रवारी दिवसभर आंबा महोत्सव प्रदर्शन व विक्री पार पडली.

या महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ४० जातींचे आंबे प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी ठेवले होते. तसेच आंब्यावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केलेल्या विविध खाद्य पदार्थांचे महिला बचतगटांचे ७ दालन होते.

आंबा महोत्सवाच्या उद्घाटनाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख अध्यक्षस्थानी होते.

Mango Festival
Mango Season : आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सपुंष्टात

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सावजी, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, आत्मा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश कानवडे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश जाधव, माविमचे सहजिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, विनायक सरनाईक उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी आंबा घन लागवड पद्धतीचे फायदे सांगितले. तसेच भारतीय आंबा फळाला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत बाजारपेठेत प्रचंड मागणी असल्याने त्याच्या लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आंबा महोत्सव आयोजनाबाबत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू यांनी माहिती दिली. पुरुषोत्तम उन्हाळे यांनी आंब्याच्या स्थानिक जाती व जैवविविधतेची सांगड घालून शेतकऱ्यांनी आंबा लागवड करावी असे आवाहन केले. मनोजकुमार ढगे यांनी आंबा फळबाग लागवड आणि शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी जिल्ह्यात आंब्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. महोत्सवात स्थानिक आंबा जातींची ओळख, आंबा फळाच्या विविध वाणांची प्रदर्शनी व विक्री, आंबा लागवड व व्यवस्थापनासाठी तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन आणि आंब्याच्या वाणांची कलम विक्री, तसेच आंब्यापासून बनविलेले विविध प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनेश यदुलवार यांनी केले. डॉ. भारती तिजारे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com