Soybean Procurement : सोयाबीनची साडेतेरा लाख क्विंटल खरेदी

Soybean Market : नांदेड जिल्ह्याला किमान हमी दरानुसार १४ लाख ५८ हजार १६० क्विंटल सोयाबीन खरेदीचे लक्षांक देण्यात आले होते.
Soybean, Chana Futures Ban
Soybean, Chana Futures BanAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्याला किमान हमी दरानुसार १४ लाख ५८ हजार १६० क्विंटल सोयाबीन खरेदीचे लक्षांक देण्यात आले होते. यानुसार ता. फेब्रुवारीपर्यंत एनसीसीएफ या केंद्रीय एजन्सी मार्फत पाच संस्थांच्या खरेदी केंद्रावर १३ लाख ५४ जार ६६२ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.

अद्याप एक लाख तीन हजार ४९७ क्विंटल सोयाबीन खरेदीचे लक्ष्यांक शिल्लक आहे. सध्या सोयाबीन खरेदीची मुदत संपल्यामुळे सर्वच ठिकाणचे खरेदी केंद्र बंद झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात किमान हमीदरानुसार सोयाबीनची विक्रीपूर्व नोंदणी १५ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. ही नोंदणी सहा जानेवारीपर्यंत सुरु होती. या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विक्रीपूर्व नोंदणी केली.

Soybean, Chana Futures Ban
Soybean Procurement : ६३ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

यानंतर जिल्ह्यात सोयाबीनची खरेदी केंद्रे १५ ऑक्टोबरपासून सुरू झाली. सोयाबीनची ही खरेदी दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशन, दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशन, पृथाशक्ती एफपीओ, महाकिसान एफपीओ व महाकिसानवृद्धी या राज्यस्तरीय एजन्सींना देण्यात आली. या पाच एजन्सीकडून जिल्ह्यात ३५ पेक्षा अधिक खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी करण्यात आले. ही खरेदी जिल्ह्याच्या विविध भागांत झाली.

प्रारंभी शेतकऱ्यांनी विक्रीपूर्व नोंदणी तसेच खरेदीकडे पाठ फिरविली होती. परंतु बाजारात सोयाबीनचे दर घसरत गेल्यामुळे नोंदणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. तसेच सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर गर्दी होऊ लागली. शासनाने खरेदीला मिळत असलेला प्रतिसाद पाहून प्रारंभी नोंदणीसाठी आणि त्यानंतर सोयाबीन खरेदीसाठी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली.

Soybean, Chana Futures Ban
Soybean Procurement: सोयाबीनची १८ टक्केच शासकीय खरेदी

राज्य शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी १४ लाख ५८ हजार १६० क्विंटल सोयाबीन खरेदीचे लक्ष्यांक दिले होते. या काळात जिल्ह्यात पाच एजन्सीच्या खरेदी केंद्रावर १३ लाख ५४ हजार ६६२ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. तर अद्याप एक लाख तीन हजार ४९७ क्विंटल सोयाबीन खरेदीचे लक्षांक शिल्लक आहे.

दरम्यान, आजही अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्रीअभावी पडून असल्याने शेतकऱ्यांनी खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली आहे. राज्य शासनानेही केंद्राकडे पुन्हा एकदा मुदतवाढीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. परंतु केंद्राकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती सूत्राने दिली.

यंत्रणानिहाय सोयाबीन खरेदी (क्विंटलमध्ये)

यंत्रणा.......................खरेदी

पणन महासंघ...........४,७८,८७१

व्हीसीएमएफ.............१,२५,५२८

पृथाशक्ती.................३,६७,३६५

महाकिसान संघ.........१,७२,७७०

महाकिसानवृद्धी..........२,१०,१२६

एकूण....................१३,०२,४९७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com