Tur Procurement Center : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११ तूर खरेदी केंद्र सुरू

Tur Market : शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तूर खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या पिकाची नोंदणी करून शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर न्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही. यू. राठोड यांनी केले आहे.
Tur Procurement
Tur ProcurementAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यात आधारभूत दरानुसार महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) मार्फत तूर खरेदीसाठी ११ खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तूर खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या पिकाची नोंदणी करून शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर न्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही. यू. राठोड यांनी केले आहे.

जिल्ह्यात तूर खरेदीसाठी कार्यान्वित कऱण्यात आलेल्या केंद्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, पाचोड, शिवना, विहामांडवा या ११ तूर खरेदी केंद्राचा समावेश आहे.

Tur Procurement
Tur Procurement: खुल्या बाजारात तुरीची उलाढाल वाढली

तूर खरेदीकरिता शेतकरी नोंदणी २४ जानेवारीपासून करण्यात येत असून, प्रत्यक्षात तूर खरेदी १३ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. खरेदी १३ मेपर्यंत सुरू राहणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपला सातबारा उतारा, पीक पेरा, आधार कार्ड व बॅंक पासबुक घेऊन जावे आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी त्यानंतर एसएमएस प्राप्त झाल्यावर शेतीमाल खरेदी केंद्रावर न्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही. यू. राठोड यांनी केले आहे.

Tur Procurement
Tur Bonus Procurement : तुरीची हमीभावाने खरेदी सुरु करून बोनस द्यावा; शेतकऱ्यांची मागणी

बीड जिल्ह्यात ३० केंद्रे

बीड जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून तूर खरेदीसाठी ३० केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याआधी या सर्व केंद्रांवरून विहित मुदतीत २० हजार ९६९ शेतकऱ्यांकडून ५ लाख ९४ हजार २०१ क्विंटल १३ किलो सोयाबीनची ४८९२ प्रतिक्विंटल या आधारभूत दराने खरेदी करण्यात आली आहे.त्यापैकी सुमारे २० ते २५ हजार क्विंटल सोयाबीन अजून गोडाऊनमध्ये साठविणे बाकी आहे.

जालन्यात १५ केंद्रे

जालना जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुमारे १५ केंद्रे तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रावरून आधी सोयाबीनची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली होती. खरेदी केलेल्या सोयाबीन पैकी सुमारे १५ ते २० हजार क्विंटल सोयाबीन अजून गोडाउनमध्ये साठविणे बाकी होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com