Green Chilies Rate : राज्यात हिरवी मिरची १००० ते ४००० रुपये किलो

राज्यात हिरव्या मिरचीचे दर गगनाला
Green Chilies Rate
Green Chilies Rate Agrowon
Published on
Updated on

कोल्हापुरात : १००० ते २५०० रुपये

कोल्हापूर : येथील बाजारसमितीत (Kolhapur APMC) हिरव्या मिरचीस दहा किलोस 100 ते 250 रुपये इतका दर मिळाला. बाजारसमितीत हिरव्या मिरचीची 700 ते 800 पोती आवक झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे.यामुळे मिरचीच्या काढणीत मोठा व्यत्यय येत आहे. यामुळे मिरचीची दैनंदिन आवक कमी जास्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मिरचीच्या दरात वाढ होत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सध्या हिरव्या मिरचीची बेळगाव सीमा भागातून आवक होत आहे.

सोलापुरात हिरवी मिरचीला सर्वाधिक ३००० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीला पुन्हा चांगला उठाव मिळाला. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दरही टिकून राहिले. मिरचीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक रोज ५० ते १०० क्विंटलपर्यंत राहिली. अलीकडच्या दीड-दोन महिन्यांपासून मिरचीला सातत्याने दर मिळत आहे. त्यात या पंधरवड्यात किंचित चढ-उतार वगळता दर टिकून आहेत. मिरचीची आवक स्थानिक भागातूनच राहिली. या सप्ताहात मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवकेचे प्रमाण रोज साधारण १०० क्विंटलपर्यंत होते. तर दर प्रतिक्विंटलला किमान ९५० रुपये, सरासरी २५०० रुपये, सर्वाधिक २८०० रुपये असा होता, असे सांगण्यात आले.

Green Chilies Rate
Banana Crop Management : शेतकरी नियोजन पीक : केळी

पुण्यात २००० ते ३५०० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी (ता.२०) हिरव्या मिरचीची सुमारे १५ टेम्पो आवक झाली होती. यावेळी दहा किलोला २०० ते ३५० रूपये दर होता. आवक प्रामुख्याने कर्नाटक, गुजरात राज्यांबरोबर महाराष्‍ट्रातील विविध जिल्ह्यांमधुन होत आहे. सध्या आवक आणि मागणी संतुलित असल्यान दर देखीर स्थिर असल्याचे ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात देखील आवक आणि दर स्थिर होते.

Green Chilies Rate
Rabi Crop Management : कोरडवाहू ज्वारी, हरभरा लागवडीचे नियोजन

औरंगाबादमध्ये २५०० ते ४००० रुपये

ॲग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता २०) हिरव्या मिरचीची ५८ क्विंटल आवक झाली.या हिरव्या मिरचीला २५०० ते ४००० रुपये प्रति क्विंटल दरम्यान तर सरासरी ३२५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १३ ऑक्टोबरला ११४ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे सरासरी दर ३२५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १५ ऑक्टोबरला ५८ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १६ ऑक्टोबरला हिरव्या मिरचीची आवक ४८ क्विंटल तर सरासरी दर ४००० रुपये प्रति क्विंटल राहिला. १७ ऑक्टोबरला ३९ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे सरासरी दर ४००० रुपये प्रति क्विंटल राहिले. १८ ऑक्टोबरला हिरव्या मिरचीची आवक ५२ क्विंटल तर सरासरी दर ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १९ ऑक्टोबरला ७६ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी ३२५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.

अकोल्यात ३००० ते ३५०० रुपये

अकोला ः येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी (ता. २०) हिरवी मिरची ३००० ते ३५०० रुपयांदरम्यान प्रतिक्विंटल विक्री झाली. बाजारात सुमारे ४० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले.

अकोला या विभागात मध्यवर्ती बाजार असल्याने विविध जिल्ह्यातून या ठिकाणी भाजीपाला, मिरचीची आवक होत असते. सध्या स्थानिकसह इतर भागातून मिरची विक्रीला येत आहे. यंदा सततच्या पावसाने मिरचीचे अतोनात नुकसान झालेले आहे. पीक सावरू लागताच पाऊस व ढगाळ वातावरण पिकाला फटका देत आहे. त्यामुळे मिरचीची आवक तुलनेने कमी आहे. येत्या काळात आता आवक वाढू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. गुरुवारी आवक झालेल्या मिरचीला साधारणपणे ३२०० रुपयांपर्यंत सरासरी दर भेटला. मिरचीची किरकोळ विक्री ४० ते ६० रुपये प्रतिकिलोने ग्राहकांना व्यापारी करीत होते.

नगरला २००० ते ४००० रुपये

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (गुरुवारी) हिरव्या मिरचीची ११३ क्विंटलचे आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रत्येक इंटर अडीच हजार ते चार हजार रुपये व सरासरी ३२५० रुपयाचा प्रतिक्विंटल तर मिळाला.

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्याभरात सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे हिरव्या मिरचीची आवक कमी झाली आहे. रविवारी (ता. १६) ७४ क्विंटल आवक होऊन अडीच हजार ते तीन हजार रुपये व सरासरी २७५० रुपयाचा दर मिळाला. ९ ऑक्टोबर रोजी ११७ क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते साडेचार हजार रुपये तर सरासरी ३७५० रुपयाचा दर मिळाला. सहा ऑक्टोबर रोजी १४७ क्विंटल ची आवक होऊन २५०० ते पाच हजार व सरासरी ३७५० रुपयांचा दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com