आंब्याची अतिघन लागवड करा : डॉ. कापसे

सध्याचा काळ हा अतिघन फळबाग लागवडीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता थोड्याफार प्रमाणात का होईना आंब्याच्या अतिघन लागवडीकडे वळावे.
Jalana Farmer
Jalana Farmer Agrowon
Published on
Updated on

जालना : ‘‘सध्याचा काळ हा अतिघन फळबाग (Orchard) लागवडीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता थोड्याफार प्रमाणात का होईना आंब्याच्या अतिघन लागवडीकडे वळावे,’’ असे मत फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

ॲग्रो इंडिया गट शेती संघाचा २०६ वा द्वादश शेतकरी मेळावा नुकताच भातोडी (ता. जाफराबाद) येथे उत्साहात झाला.
डॉ. कापसे म्हणाले, ‘‘या वर्षी अतिघन लागवडीच्या औरंगाबाद, सोलापूर, सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी बागा आहेत. त्या पाहण्यासाठी स्वतः ६० ते ७० शेतकऱ्यांचा (Farmer) तीन दिवसांचा दौरा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यात येईल. या वर्षी गट शेतीमध्ये (Agriculture) मिरचीची (Chili) मोठी लागवड होणार आहे. त्यामुळे गट शेतीतील सुशिक्षित युवकांनी स्वतः निर्यातदार व्हावे. त्यासाठी जे सध्याचे निर्यातदार (Export) आहे, त्यांच्याबरोबर काही दिवस काम करता येईल.’’

Jalana Farmer
फळबाग, विमा, संशोधन, सिंचनासाठी तरतुदी

‘हळदीचे बहुमजली पद्धतीने पाच ते सहा पट उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. त्यासाठी पुढच्या द्वादशीला या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन ठेवण्यात येईल. या वर्षी शेतकऱ्यांना द्राक्षाचे उत्पादन चांगले आले. परंतु भाव कमी असल्यामुळे फारसा नफा (Profit) झाला नाही,’’ असेही डॉ. कापसे म्हणाले. कापूस पीक विशेषज्ञ डॉ. एस. एस. माने यांनी कापसाच्या अतिघन लागवडीचे फायदे सांगितले. ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी या वर्षी नऊ इंच बाय साडेतीन फुटावर कापसाची (cotton) लागवड करावी. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन सव्वा ते दीडपट वाढू शकते. या संदर्भात लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करू.’’

या वेळी शिवार फेरीचा कार्यक्रम नांदखेडा येथील शरद सवडे यांच्या द्राक्ष बागेत झाला. रामेश्‍वर गायके, विष्णू गायके यांच्या उच्च तंत्रज्ञान आधारित शेडनेटमधील संकरित टोमॅटो आणि खरबूज बीज उत्पादनाची पाहणी करण्यात आली. यशस्वितेसाठी विष्णू उगले, गणेश मस्के, संतोष देशमुख आदींनी प्रयत्न केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com