Flower Market : झेंडू फुलांच्या विक्रीत पदरी निराशा; अनेक उत्पादकांचा निघाला नाही खर्च

Marigold Flower Rate : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्रीसाठी झेंडू फुले घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली.
Marigold
Marigold Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्रीसाठी झेंडू फुले घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. दसऱ्याच्या आदल्या दिवशी ३० ते ४० रुपये प्रति किलोने विकला गेलेला झेंडू दसऱ्याच्या दिवशी पाच ते दहा रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली घसरला. एवढेच नाही तर अनेक झेंडू विक्रेते यांनी विकण्यापेक्षा तसाच फुलाचा गंज सोडून जाणेच पसंत केल्याची स्थिती पाहायला मिळाली.

मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत आहे. त्यामुळे रब्बीची आशा मोठ्या प्रमाणात धूसर होत चालली आहे. असे असताना यंदा मोठ्या प्रमाणात झेंडू फुल शेती नवरात्र, दसरा, दिवाळी या अनुषंगाने फुल उत्पादकांनी केली. दररोज झेंडूच्या विक्री मध्ये शेतकऱ्यांना २० ते ३० रुपये प्रतिकिलोपर्यंतचे दर दसऱ्यापर्यंत मिळाले आहेत.

Marigold
Marigold Cultivation : काय आहे झेंडू लागवडीचे सुधारित तंत्र?

नवरात्र बरोबरच दसऱ्याला झेंडू फुलांची विशेष महत्त्व असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांची थेट विक्री करण्याचा मार्गही निवडला. परंतु हा मार्ग त्यांच्यासाठी नुकसानीचा ठरल्याची स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाड्याच्या विविध जिल्हासह विदर्भातील काही जिल्ह्यातून झेंडू फुलांची मोठी आवक झाली होती. दसऱ्याच्या आदल्या दिवशी झेंडू फुलांना ३० ते ४० रुपये प्रति किलोचा दर मिळाला होता.

दसऱ्याच्या दिवशी फुलांचे दर वाढतील अशी उत्पादक व विक्रेते यांना आशा होती. परंतु मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर वाढण्याची खाली घसरत गेले. ३० रुपयांवरून २५, २०, १५, १०, ५ रुपये प्रतिकिलोपर्यंत दर घसरले.

शिवाय मागणीपेक्षा उपलब्धता जास्त झाल्याने फुलांची विक्रीही झाली नाही. त्यामुळे अनेक विक्रेते व स्वतः फुल घेऊन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी फुलांची विक्री करण्याऐवजी ओळखी पाळखीच्यांना मोफत फुले देऊन, उरलेले फुले जागीच सोडून जाणे पसंत केले.

Marigold
Marigold Flower Price : टोमॅटो, कांद्यानंतर आता झेंडू रस्त्यावर फेकण्याची वेळ; सणासुदीत दर पडल्याने शेतकरी चिंतेत

अनेक शेतकऱ्यांचा फुल घेऊन येण्याचा वाहनाचा खर्चही वसूल झाला नाही. तर काही शेतकऱ्यांना येण्या जाण्याचा खर्च निघून दोन दिवस जेवणाचा खर्च भागेल एवढेच उत्पन्न झेंडू फुले विक्रीतून मिळाले.

त्यामुळे दसऱ्यात पदरी निराशा पडलेला शेतकऱ्यांना आता दिवाळीत झेंडू फुलांना चांगला दर मिळेल अशी आशा आहे. दुसरीकडे शहरातील विविध भागात महापालिकेने रस्त्यावर पडलेल्या फुलांचा ढीग उचलून त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम बुधवारी (ता. २५) दुपारपर्यंत सुरूच ठेवले होते. बाजार समितीच्या आभारातही अशीच स्थिती होती.

दसऱ्याच्या आदल्या दिवशी २५ ते ३० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला. दसऱ्याच्या दिवशी मात्र पाच दहा रुपये प्रतिकिलोपर्यंत दर खाली घ्यावे लागले. शिवाय शेवटच्या टप्प्यात तर फुलांना कोणी विचारेनासे झाले. दोन दिवस जेवणाचा खर्च आणि जाण्या-येण्याचे भाडे तेवढे निघाले. आता दररोजच्या बाजारासह दिवाळीच्या सणात फुलांकडून आशा आहे.
- नारायण कंकाळ, शिरसगाव, ता. परतूर, जि. जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com