Banana Export : निर्यातीच्या केळीला सरासरी २००० रुपये दर शक्य

Banana Market Rate : यंदा तब्बल दोन हजार ते २१०० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची आखातात निर्यात होईल, अशी अपेक्षा आहे.
Banana Export
Banana ExportAgrowon

Jalgaon Banana Market Update : खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळीची निर्यात (Banana Export) वर्षागणिक वाढत आहे. यंदा तब्बल दोन हजार ते २१०० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची आखातात निर्यात होईल, अशी अपेक्षा आहे. निर्यात जशी वाढत आहे, तशी दरातही मागील तीन वर्षांत वाढ किंवा सुधारणा दिसत आहे.

२०१२ मध्ये निर्यातीच्या केळीला १३०० रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर मिळाला होता. २०२१ मध्ये हा दर सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल, असा राहिला. यंदा मार्चमध्ये ३२०० ते ३२५०, मार्चच्या मध्यात २८०० आणि मार्चअखेरीस २७०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता.

या महिन्यात २४०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. केळीची निर्यात जूनपर्यंत सुरू राहील. जूनपर्यंत दर टिकून राहतील, अशी अपेक्षा असून यंदा सरासरी दर २००० रुपये प्रतिक्विंटल, असे राहतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Banana Export
Banana Market Update : खानदेशात केळी दरात घसरण सुरूच

केळी निर्यातीच्या कार्यवाहीसाठी काही बड्या कंपन्या खानदेशात केळीची खरेदी करीत आहेत. या कंपन्यांनी पश्चिम बंगालमधील सुमारे साडेचार हजार मजूर केळी पॅकिंग, काढणीच्या कार्यवाहीसाठी उपलब्ध केले आहेत. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे केळी निर्यातीला फटका बसला.

कारण कुशल मजूर उपलब्ध होत नव्हते. तसेच वाहतुकीसंबंधीदेखील अडचणी होत्या, निर्यात रखडत सुरू होती. परंतु २०२१ मध्ये खानदेशातून सुमारे १२०० कंटेनर आखातात निर्यात झाली.

Banana Export
Banana Market : खानदेशात केळी दर दबावात

त्या वर्षी रोज आठ कंटेनर केळीची निर्यात आखातात झाली. त्यानंतर २०२२ मध्ये प्रतिदिन सरासरी १० कंटेनर केळीची आखातात मार्च ते जून यादरम्यान निर्यात झाली. यंदा ही निर्यात मार्चपासून ते एप्रिलच्या मध्यापर्यंत प्रतिदिन सरासरी १३ कंटेनर अशी राहिली आहे.

यात चार कंटेनर रोज शहादा तालुक्यातून एका कंपनीच्या मदतीने आखातात पाठविले जात आहेत. जळगाव जिल्ह्यातून रोज सात कंटेनर केळीची निर्यात आखातात होत आहे.

तर धुळ्यातून ही रोज दोन ते तीन कंटेनर केळीची निर्यात आखातात कंपन्या करीत आहेत. सावदा (ता. रावेर), तांदलवाडी (ता. रावेर) येथील केळी पॅक हाऊसची मदत केळी निर्यातदार कंपन्यांना केळी पॅकिंग व इतर कार्यवाहीसाठी होत आहे. निर्यातीच्या केळीला दर टिकून राहण्याची अपेक्षा आहे.

स्थानिक बाजारात म्हणजेच दिल्ली, पंजाब, काश्मीर आदी भागातूनही खानदेशातील केळीला उठाव आहे. तेथेही मागणी आहे. परंतु स्थानिक भागातील केळी खरेदीसंबंधी व्यापारी केळीस ९००, १२०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर देत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com