या वर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकांची पेरणी जास्त झाल्याचे दिसून येते. काही ठिकाणी जमिनीत वापसा स्थिती न मिळाल्याने पेरणीस उशीर झाला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांच्याकडे उशिरा बागायती गहू पिकांची पेरणी चालू आहे. मराठवाड्यात या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात कोरडे हवामान झाले होते, त्यामुळे थंडीत वाढ झाली. किमान तापमानात सरासरीपेक्षा साधारण २ ते ७ अंश सेल्सिअस पर्यंत घट झाली. मात्र काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘निवार’ चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी सतत ढगाळ वातावरण, जोरदार वारे, रात्रीच्या तापमानात चढ-उतार अशी स्थिती अनुभवास आली. सध्या पिकांसाठी हवामान पोषक असून पीक परिस्थिती समाधानकारक दिसते. पुढील काळात पिकांच्या आवश्यकतेनुसार पिकात आंतर मशागतीची कामे, पाण्याचे नियोजन, तणनियंत्रण योग्य प्रकारे करावे. एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा आहे. रब्बी पिकाची पेरणी तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे झाल्याचे दिसते. खरीप हंगामाच्या अखेरीला पाऊस झाल्यामुळे जमिनीत ओलावा असल्याने या वर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकांची पेरणी जास्त झाल्याचे दिसून येते. काही ठिकाणी जमिनीत वापसा स्थिती न मिळाल्याने पेरणीस उशीर झाला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांच्याकडे उशिरा बागायती गहू पिकांची पेरणी चालू आहे. कापूस
पाणी बचतीसाठी...
गहू गहू हे एक रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. समशितोष्ण हवेच्या पट्ट्यात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात आढळून येते. गव्हाला थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्य प्रकाशित हवामान चांगले मानवते.
हरभरा
संपर्क : डॉ. के. के. डाखोरे, ९४०९५४८२०२ (अखिल भारतीय समन्वयक संशोधन कृषी हवामानशास्त्र योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.