आंतरपिकांच्या पेरणीचे नियोजन

अधिक आंतरपिकांची मालिका असेल तर दोन्ही पिकांची पेरणी एकाच वेळेस करता येते. त्यासाठी पेरणीयंत्रामधील बियाण्‍याच्‍या कप्प्यामध्ये निश्‍चित ओळीनुसार बियाणे टाकून पेरणी करावी.
ताटी पद्धतीने वाल लागवड.
ताटी पद्धतीने वाल लागवड.
Published on: 
Updated on: 

अधिक आंतरपिकांची मालिका असेल तर दोन्ही पिकांची पेरणी एकाच वेळेस करता येते. त्यासाठी पेरणीयंत्रामधील बियाण्‍याच्‍या कप्प्यामध्ये निश्‍चित ओळीनुसार बियाणे टाकून पेरणी करावी. मुख्य पिकाची पेरणी केल्यानंतर आंतरपिकाची पेरणी मोग्यामधून करता येते. विविध आंतरपीक पद्धती  सोयाबीन + तूर (४:२), कापूस + मूग (१:१), कापूस + सोयाबीन (१:१), ज्वारी + तूर (४:२), मका + मूग (१:१) आणि बाजरी + तूर (३:३) या आंतरपीक पद्धती प्रामुख्याने चांगल्या आहेत. सोयाबीन + तूर (४:२) आंतरपीक 

  • मुख्य पीक आणि आंतर पीक दोन्ही कडधान्य वर्गीय असून हमखास उत्पन्न देणारी आंतर पीक पद्धती म्हणून लो‍कप्रिय आहे.
  • मध्यम जमिनीत, हमखास पावसाच्या प्रदेशात तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आंतरपीक पद्धती आहे.
  • कापूस + मूग/उडीद (१:१) आंतरपीक 

  • हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम ते भारी जमिनीमध्ये घेण्याची शिफारस कापसाच्या अमेरिकन संकरित (बीटी) आणि सरळ वाण (देशी कापूस) यांच्यासाठी ९० × ६० सेंमी अंतरावर कापसाच्या दोन ओळी टोकण करून मध्ये उडदाचे आंतरपीक घ्यावे.
  • रासायनिक खतांच्या नियोजनात कापसासाठी शिफारस केलेली पूर्ण मात्रा (नत्र : स्फुरद : पालाश , कोरडवाहू बीटीसाठी १२०:६०:६०, देशी जातीसाठी ८०:४०:४०, बागायती बीटी कपाशीसाठी १५०:७५:७५) विभागून द्यावी. सोबतच २५ टक्के आंतरपिकासाठी खताची मात्रा मिसळून ही पूर्ण मात्रा कापूस + उडीद/ कापूस + मूग या आंतरपीक पद्धतीमध्ये वापरावी.
  • उडदासारखी मुगाची एक ओळ कापसाच्या दोन ओळींतील अंतरामध्ये घ्यावी.
  • कापूस + सोयाबीन (१:१) आंतरपीक 

  • भारी जमिनीमध्ये आणि ज्या ठिकाणी थोडा सखोल भाग आहे अशा भागात कापूस + सोयाबीन ही आंतर पिके घ्यावीत.
  • सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींची (एमएयूएस-७१) निवड करावी. उशिराने तयार होणाऱ्या जाती निवडू नयेत.
  • ज्वारी + तूर आंतरपीक 

  • ज्वारी + तूर ही आंतर पीक पद्धती ३:३ किंवा ४:२ ओळीच्या प्रमाणात आहे.
  • ज्वारीचे पीक ११० ते ११५ दिवसांत निघून गेल्यावर ज्वारीच्या पाटातील ओलावा, अन्नद्रव्य तुरीच्या पिकास मोठ्या प्रमाणात (गरजेनुरूप) उपलब्ध होते.
  • मोकळी हवा, सूर्यप्रकाश यामुळे तुरीच्या सलग पिकापेक्षाही निखुळ्या तुरीपेक्षा आंतरपीक पद्धतीतील तुरीचे पीक अधिक जोमदार येऊन चांगल्या प्रमाणात उत्पादन मिळते.
  • निखुळ्या तुरीच्या उलट, आंतर पीक पद्धतीमुळे पीक क्षेत्रातील सूक्ष्म वातावरण मुख्य पीक तथा आंतरपिकाप्रमाणे पट्ट्यापट्ट्यांत बदलत जाते. या सूक्ष्म वातावरणातील फेरपालट आंतरपीक पद्धतीमुळे स्वयंचलित बनते. त्यामुळे तूर व ज्वारी यांच्यावर येणाऱ्या किडी व रोगांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी प्रमाणात होते.
  • मका + मूग (१:१) आंतरपीक   मक्याच्या ६० × ३० सेंमी अंतरावर पेरणी करून दोन ओळींमध्ये मुगाची एक ओळ पेरावी. बाजरी + तूर (३:३) आंतरपीक  कमी पावसाचा भाग, मध्यम जमिनी तथा उशिरा पेरणीसाठी ही पद्धत योग्य आहे. मुख्‍य पीक व आंतरपिकासाठी लागणारे प्रति हेक्टरी बियाणे आंतरपीक पद्धती--- आंतरपिकासाठी बियाणे (प्रति हेक्‍टरी) मुख्यपीक --- आंतरपीक सोयाबीन + तूर (४:२)--- ४७ किलो--- ५ किलो ज्वारी + तूर (४:२)--- ७ किलो--- ५ किलो बाजरी + तूर (३:३) ---१.५ किलो---७ किलो कापूस + मूग (१:१)---- २.५ किलो--- ४ किलो कापूस + उडीद (१:१)--- २.५ किलो--- ४ किलो कापूस + सोयाबीन (१:१)--- २.५ किलो--- २५ किलो मका + मूग (१:१)---१५ किलो ---४ किलो -  डॉ. बी. व्ही. आसेवार, ७५८८०८२१३६ (विभाग प्रमुख, कृषिविद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com