

नुकतेच फुलोऱ्यात आलेल्या हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी. कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नांगराने तास घेऊन प्रत्येक सरीमध्ये टाकावे. हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरून फळी फिरवावी. त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय घटक पूर्णपणे झाकले जाऊन कुजण्याची क्रिया वेगाने सुरु होते. ताग, धैंचा, मूग, उडीद, चवळी व बरसीम यासारखी द्विदल पिके शेतात वाढवून नंतर ती त्याच शेतात गाडली जातात. ही पिके ४५ ते ५० दिवसापर्यंत आणि पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यानंतर त्याची कापणी करून नांगराच्या साह्याने जमिनीत गाडली जातात. ही पिके ४५ दिवसाची झाल्यानंतर त्यात सेंद्रिय पदार्थांचे अधिक उत्पादन मिळते, मात्र ह्युमसचा पुरवठा कमी होतो. पण हिरवळीची पिके ६० ते ७० दिवसांची असताना जमिनीत गाडली असता जमिनीस ह्युमसचा पुरवठा होऊन अन्नद्रव्यांचा पुरवठासुद्धा वाढतो. तागामुळे ९० किलो नत्र आणि धैंचामुळे ७० किलो नत्र प्रति हेक्टरी जमिनीत मिसळले जाते. शेतात गाडलेल्या हिरवळीच्या पिकाचे विघटन होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर पीक लागवड करता येते.हिरवळीचे खत म्हणून करंज, भेंड, अंजन आणि गिरीपुष्पाचा पाला जमिनीत मिसळता येतो. हिरवळीचे पीक लवकर आणि भरपूर वाढणारे असावे. पीक रसरशीत आणि तंतूमय असावे. त्यामुळे ते जमिनीत लवकर कुजते. पीक कोणत्याही जमिनीत वाढणारे आणि शेंगावर्गीय असावे. पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडावे. पिकाला सिंचनाची सुविधा असावी, त्यामुळे त्याची चांगली वाढ होते. हिरवळीच्या खताचे फायदे
हिरवळीच्या खतांचे प्रकार शेतात लागवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते हिरवळीचे पीक शेतात सलग ,मिश्र किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात. त्याच शेतात ते पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरून मिसळतात. या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार ,चवळी ,धैंचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी, लसूण घास, बरसीम या पिकांचा समावेश असतो. हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत पडीक जमिनीवर किंवा जंगलात वाढणाऱ्या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडली जातात. किंवा पडीक जमीन किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या खतासाठी उपयुक्त झाडांची लागवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणी किंवा चिखलणीच्यावेळी जमिनीत मिसळली जातात. हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी, करंज, सुबाभूळ, टाकळा, किंजळ यांची हिरवी पाने, कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात. हिरवळीचे खत तयार करण्याच्या पद्धती
हिरवळीच्या खतांची पिके ताग / बोरु
धैंचा
घेवडा हे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते.पाणथळ जमिनीत हे पीक योग्य नाही. पावसाळ्याच्या सुरवातीला प्रती हेक्टरी ५० किलो बियाणे लागते. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जमिनीत गाडावे. सेंजी रब्बी हंगामासाठी हे उपयुक्त हिरवळीचे खत आहे. पिकाला सिंचनाची आवश्यकता असते. हेक्टरी ३० ते ४० किलो बियाणे लागते. जानेवारीच्या अखेरीस जमिनीत गाडावे. उसासाठी हे योग्य हिरवळीचे खत आहे. द्विदल पिके पावसाळ्याच्या सुरवातीस जमीन तयार करून मूग, चवळी, उडीद, कुळीथ, गवार यांचे बियाणे शेतात पेरावे. या द्विदल वर्गीय पिकांचा हिरवळीच्या खतासाठी चांगला उपयोग होतो. जमिनीची पूर्व मशागत केल्यावर मूग ,उडीद ,कुळीथ यांचे प्रति हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे पेरावे. पेरणीपूर्वी बियाणास रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरणी करून जमिनीत गाडावे. यापासून प्रति हेक्टरी ५० ते ६० किलो नत्राचा पुरवठा होतो. गिरीपुष्प (ग्लिरीसिडिया)
संपर्कः डॉ. दीपाली कांबळे,९३०७१६३९३९ (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, जि. जालना,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.