शेतकरी नियोजन पीक : सोयाबीन

यंदा उन्हाळी सोयाबीनचा प्रथमच प्रयोग केला होता. लागवडीसाठी फुले संगम (केडीएस-७२६) या वाणाची निवड केली होती. यातून एकरी १८ क्विंटल उत्पादन मिळाले.याच क्षेत्रात एक महिन्याची विश्रांती देऊन खरीप हंगामासाठी जमीन तयार केली. हे वाण माझ्यासाठी फायद्याचे वाटत असल्याने खरीप हंगामासाठीही तीच जात निवडली आहे.
Germination of soybean in Pankaj Patil's field.
Germination of soybean in Pankaj Patil's field.
Published on
Updated on

शेतकरी :  पंकज भिमगोंडा पाटील, गाव :  वसगडे, ता. पलूस, जि. सांगली. एकूण क्षेत्र :   चार एकर सोयाबीन क्षेत्र :  १ एकर माझी वसगडे (ता. पलूस) येथे चार एकर बागायत शेती आहे. शेत जमीन काळी, मध्यम भारी प्रकारची आहे. मी गेल्या ५ ते ६ वर्षांपासून खरीप सोयाबीनचे उत्पादन घेत आहे. यंदा उन्हाळी सोयाबीनचा प्रथमच प्रयोग केला होता. उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी फुले संगम (केडीएस-७२६) या वाणाची निवड केली होती. यातून एकरी १८ क्विंटल उत्पादन मिळाले. उत्पादित सोयाबीनची बियाणे म्हणून विक्री केली. त्यासाठी खटाव (ता. पलूस) येथील प्रगतशील शेतकरी तात्यासो नागावे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.  याच क्षेत्रात एक महिन्याची विश्रांती देऊन खरीप हंगामासाठी जमीन तयार केली. केडीएस-७२६ हे वाण माझ्यासाठी फायद्याचे वाटत असल्याने खरीप हंगामासाठीही तीच जात निवडली आहे. लागवड टोकण पद्धतीने केली आहे. सध्या टोकण करून १४ ते १५ दिवसांचा कालावधी झाला आहे. मागील कामकाज 

  • खरीप हंगामातील सोयाबीन लागवडीसाठी उन्हाळी सोयाबीन लागवड क्षेत्रामध्येच तयारी करण्यात आली. उन्हाळी सोयाबीन पीक घेतल्यामुळे खरीप हंगामासाठी विशेष पूर्वमशागत करण्याची गरज भासली नाही. 
  • नांगरटीनंतर सिंगल सुपर फॉस्फेट ३ पोती, २५ किलो पोटॅश, १० किलो गंधक प्रति एकर याप्रमाणात देण्यात आला. गंधकामुळे सोयाबीनच्या दाण्यास चकाकी मिळते. तसेच गुणवत्ता व उत्पादन वाढीस फायदा होतो, असा माझा अनुभव आहे.
  • मी दरवर्षी शेणखताचा वापर करत असे. मात्र, यावर्षी कंपोस्ट खताचा वापर केला आहे. त्यासाठी नांगरट झाल्यानंतर ८ ते १० किलो कंपोस्ट खत शेतामध्ये पसरून घेतले. आणि नंतर रोटाव्हेटर मारून सरी काढून घेतल्या.
  • साडेतीन ते ४ फुटांच्या सरीमध्ये टोकण पद्धतीने लागवड केली आहे.
  • टोकण पद्धतीने लागवड केल्यामुळे एकरी १५ ते १६ किलो बियाणे लागले.
  • केडीएस ७२६ हे वाण १०० ते १२० दिवसांचे असल्याने ९ ते १० इंच इतके अंतर दोन रोपांमध्ये ठेवले आहे.
  • टोकण करण्यापूर्वी प्रति किलो बियाणांस थायरमची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थायामेथोक्झाम आणि रसशोषक किडींसाठी इमिडाक्लोप्रीडची प्रक्रिया केली. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे साधारण दोन तासासाठी सावलीमध्ये वाळवून घेतले. त्यानंतर पुन्हा गुळाच्या पाण्यातून पीएसबी आणि रायझोबिअम ची जैविक बीजप्रक्रिया केली.
  • टोकण करतानाच कीड-रोग नियंत्रणासाठी मका, एरंड या सापळा पिकांची लागवड केली आहे. 
  • पुढील १५ दिवसांचे कामकाज 

  • पुढील २ ते ३ दिवसांत कीटकनाशकांची फवारणी करणार आहे.
  • २५ ते ३० दिवसांदरम्यान १२ः६१ः०० आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली जाईल.
  • पीक ३५ दिवसांचे झाल्यानंतर, गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी केली जाईल.
  • खताच्या माध्यमातून पिकास नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध होते. त्यामुळे अतिरिक्त नत्र, स्फुरद आणि पालाशचा अतिरिक्त वापर करणे टाळतो.
  • गरजेनुसार पिकामध्ये चिकट सापळ्यांचा वापर केला जातो.
  • सोयाबीन पिकाच्या शाकीय वाढीपेक्षा फुटवा वाढवण्याच्या दृष्टीने मोनोअमोनियम फॉस्फेट (१२ः६१ः००) चा वापर करतो.
  • - पंकज पाटील,  ९३२१९११००८

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com