नारळ बागेचे व्यवस्थापन

सावलीसाठी नारळ रोपाच्या चारही दिशांना उंच वाढणारी केळी, पपई, एरंडी अगर गिरिपुष्प याची लागवड करावी. पावसाळा सुरू झाल्यानंतरच रोपांची लागवड करावी. आळ्यामध्ये आच्छादन करावे.
नवीन नारळ रोपांना काठीचा आधार द्यावा. आळ्यामध्ये आच्छादन करावे.
नवीन नारळ रोपांना काठीचा आधार द्यावा. आळ्यामध्ये आच्छादन करावे.
Published on
Updated on

सावलीसाठी नारळ रोपाच्या चारही दिशांना उंच वाढणारी केळी, पपई, एरंडी अगर गिरिपुष्प याची लागवड करावी. पावसाळा सुरू झाल्यानंतरच रोपांची लागवड करावी. आळ्यामध्ये आच्छादन करावे. नारळ रोप लागवडीनंतर काळजी घेणे महत्वाचे आहे. लागवड केल्यानंतर लगेच रोपांना आधार देणे आवश्यक आहे. त्यासाठी वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन रोपाच्या उंचीपेक्षा थोड्या जास्त उंचीच्या दोन काठ्या रोपापासून ४५ सेंमीवर दक्षिणोत्तर बाजूवर पुराव्यात. त्याला एक अगर दोन काठया आडव्या वाऱ्याच्या विरूध्द दिशेला बांधाव्यात. त्याला रोप इंग्रजी आठ आकडयांच्या गाठीने सैलसर बांधावे. जेणेकरून रोप वायामुळे हलून त्याच्या मुळांना इजा होणार नाही. पहिली दोन वर्षे रोपांचे उन्हापासून संरक्षण करणे आवश्यक असते. त्यासाठी विणलेले झाप, झावळी, गवत, झाडाच्या फांद्या याची कृत्रिम सावली करावी. सावलीसाठी रोपाच्या चारही दिशांना उंच वाढणारी केळी, पपई, एरंडी अगर गिरीपुष्प याची लागवड करावी. पावसाळा सुरू झाल्यानंतरच  रोपांची लागवड करावी. पहिलाच पावसात पाणी उपलब्ध आहे म्हणून लवकर लागवड करतात. परंतु पहिल्या पावसानंतर होणाऱ्या उघडिपीमुळे रोपांवर सूर्यप्रकाशामुळे इजा होण्यांचा संभव असतो.  खत नियोजन 

  • जून महिन्यात लागवड केल्यानंतर खते देण्यास सुरुवात करावी. खताचा पहिला हप्ता पाऊस संपल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये देणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसरा हप्ता फेब्रुवारीमध्ये द्यावा. 
  • झाडास १ किलो नत्र , १/२ किलो स्फुरद आणि १ किलो पालाश खताची मात्रा तीन समान हप्त्यांत (जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी) देण्यात येते. 
  • प्रत्येक उत्पादनक्षम नारळ झाडास ५० किलो गांडूळ खत आळे पद्धतीने द्यावे. 
  •  प्रत्येक झाडास १.५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा तीन समान हप्त्यांत द्यावी. 
  • नारळापासून प्रति हेक्टरी ३.४ ते ५.१ टन काडीकचरा (झाडी, फोका व इतर) उपलब्ध होतो. तर विविध मसाले पिकांपासून १६१ ते ४,४५० किलो काडीकचरा उपलब्ध होतो. उपलब्ध काडीकचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती केल्यास एक हेक्टर बागेतून २ ते ३ टन गांडूळ खत उपलब्ध होते. मसाले पिकांपासून ४८ किलो ते १.५ टन गांडूळ खत उपलब्ध होते. 
  •  पाणी नियोजन

  • नारळ हे बागायती पीक आहे. नारळाला ठिबकद्वारे किंवा आळ्यात पाणी द्यावे लागते. लहान रोपांना प्रति दिन १० लिटर पाणी द्यावे. 
  • फळ लागणाऱ्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे ऑक्टोबर ते जानेवारीमध्ये प्रति दिन ३० लिटर पाणी आणि फेब्रुवारी ते मेपर्यंत प्रति दिन ४० लिटर पाणी द्यावे. खोडापासून १.२५ मीटर अंतरावर गोलाकर लॅटरल पाइप टाकून त्याला ६ ड्रीपर लावावेत. 
  • आच्छादन 

  • रोपांना दिलेले पाणी बाष्पीभवनाने निघून जाते, म्हणून आळ्यामध्ये एक वीत उंचीपर्यंत पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. 
  • ओलावा टिकून राहिल्यामुळे पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वाढविता येते. यामुळे पाण्याची बचत होते. 
  •  काही कारणाने उन्हाळ्यात एखादी पाण्याची पाळी वेळेवर देता आली नाही किंवा चुकली तर मुळांना उन्हाचा त्रास होत नाही. 
  • आच्छादनासाठी वापरलेल्या पालापाचोळा पुढील पावसाळ्यात कुजून रोपांना सेंद्रिय खत मिळते.
  • वेळोवेळी तण काढून आळे स्वच्छ ठेवावे. 
  • पाऊस, ढगाळ वातावरणात बागेची काळजी   सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नारळ बागेत बराच वेळ पाणी साचून राहते. यामुळे झाडाच्या शरीरक्रिया मंदावतात,योग्य अन्नग्रहण करण्यात अडथळे निर्माण होतात. झावळ्या निस्तेज व निष्क्रिय होतात. नवीन झावळी व फुलोरा येण्यास उशिरा होतो. मादी फुलांचे परागीकरण झालेले असले तरी मादी फुले  गळतात. उपाययोजना 

  • बागेत पाण्याचा योग्य निचरा करावा. नारळ बागेतील साचलेले पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी योग्य मार्ग करावा. 
  • माडाच्या बुंध्यावर मातीची भर द्यावी. बाग तण काढून स्वच्छ ठेवावी.
  • गोलाकार अळी तयार करावीत. खते दिली असल्यास अळी स्वच्छ करून बाजूच्या मातीने बुंध्याला भर देणे आवश्यक आहे. 
  • मुळे तंतुमय प्रकारातील असल्यामुळे पाऊस संपल्यानंतर बुंध्यात मातीची भर द्यावी. त्यामुळे मुळांचे संरक्षण होऊन अन्नग्रहण क्षमता वाढते. 
  • जुन्या बागेत स्वच्छता करावी. जेथे फळे येतात त्याठिकाणी शिल्लक असलेले जूने नारळाचे देठ, फोकी, वांझ पोयी व इतर कचरा काढून टाकावा. बागेतील पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत तयार करावे. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढविण्यास मदत होते.
  • - डॉ.व्ही.व्ही.शिंदे,  ९५१८९४३३६३, (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि.रत्नागिरी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com