तेलंगणात उभारणार पामतेल प्रक्रिया कारखाना

तेलंगणा राज्य सहकारी तेलबिया उत्पादक महासंघाकडून (TS Oilfed) सिद्दीपेट जिल्यातील नरमेट्टा येथे हा पामतेल प्रक्रिया कारखाना उभारण्यात येणार आहे. फेडरेशनने त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी केली आहे.
Palm Oil
Palm Oil Agrowon
Published on
Updated on

खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत तेलंगणामध्ये पामतेलाची लागवड करण्यात येत आहे. या पामतेलावर प्रक्रिया करण्यासाठी एक पाम तेल प्रक्रिया कारखाना उभारण्यात येणार आहे.

तेलंगणा राज्य सहकारी तेलबिया उत्पादक महासंघाकडून (TS Oilfed) सिद्दीपेट जिल्यातील नरमेट्टा येथे हा पामतेल प्रक्रिया कारखाना उभारण्यात येणार आहे. फेडरेशनने त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी केली आहे. नरमेट्टा येथील ६० एकराच्या परिसरात हा कारखाना उभारण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना भातपिकापासून इतर पिकांकडे आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. सिद्दीपेट मतदारसंघातील शेतकऱ्यांनी ३ हजार एकर क्षेत्रात पामतेलाची लागवड केली आहे. जिल्ह्यातील २० हजार एकराचे क्षेत्र पामतेल लागवडीखाली आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पुरवले जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

एक एकर क्षेत्रातील भातपिकाला जेवढी वीज, पाणी लागते तेवढ्यात चार एकर क्षेत्रात पामातेलाचे उत्पादन घेता येऊ शकते. पामतेल लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी दीड लाख रुपयांचे हमखास उत्पन्न मिळू शकते. याशिवाय आंतरपिकांच्या माध्यमातून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील, असेही रेड्डी म्हणाले आहेत.

Palm Oil
कसा जमायचा मागणी-पुरवठ्याचा मेळ ?

येत्या ६ वर्षांत तेलंगणा सरकार २० लाख एकर क्षेत्र पामतेलाच्या लागवडीखाली आणणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन वर्षांत १० लाख एकर क्षेत्र पामतेल लागवडीखाली आणले जाणार आहे.

राज्यात सध्या ५० हजार एकर क्षेत्रात पामतेलाची लागवड करण्यात येते. भातपिकाला पर्याय म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांना पामा तेल लागवडीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांतील हवामान पामतेल लागवडीला पोषक असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com