कसा जमायचा मागणी-पुरवठ्याचा मेळ ?

देशातील खाद्यतेलाचं उत्पादन अन आपली खाद्यतेलाची गरज यांचा ताळमेळ बसत नसल्यानं भारत मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची आयात करत असतो. देशातील खाद्यतेलाची गरज भागवण्यासाठी आपल्याला आयातीवरच निर्भर रहावं लागतं.
Edible Oil Production not in Sync with Growth in Consumption
Edible Oil Production not in Sync with Growth in Consumption
Published on
Updated on

देशातील खाद्यतेलाचं (edible oil) उत्पादन अन आपली खाद्यतेलाची गरज यांचा ताळमेळ बसत नसल्यानं भारत मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची आयात करत असतो.  देशातील खाद्यतेलाची गरज भागवण्यासाठी आपल्याला आयातीवरच (import) निर्भर रहावं लागतं. गेल्या दशकभरातलं आपलं खाद्यतेलाच्या आयातीचा प्रमाण १७४ टक्क्यांनी वाढलंय. त्यामुळं भारताला खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भर होण्याची गरज भासायला लागलीय. रशिया- युक्रेन (Russia -Ukraine) युद्धामुळं ही गरज आणखी तीव्र बनलीय.   हेही वाचा-Soyabean Price: देशात सोयाबीन मोठा साठा?     इंडोनेशियाने (Indonesia) पामतेलाच्या देशांतर्गत विक्रीवरील २० टक्क्यांची मर्यादा वाढवून ३० टक्क्यांवर नेल्याचे सांगताना सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने (एसइए) आंतरराष्ट्रीय बाजारातील खाद्यतेलाच्या किमती भडकण्याची शक्यता वर्तवलीय.   भारत (India), अर्जेंटिना, ब्राझीलसह रशिया आणि युक्रेनलाही पामलतेलाचा पुरवठा इंडोनेशिया आणि मलेशियाकडून येतो. रशिया-युक्रेन संघर्ष असो वा अन्य संघर्ष असेल खाद्यतेलाचा पुरवठा विस्कळीत होणं ही भारतासाठी धोक्याची घंटा असल्याचं एसइएनं म्हटलं आहे. खाद्यतेलाचा बाहेरून होणारा पुरवठा असा विस्कळीत झालेला तर किमती गगनाला भिडलेल्या मग देशांतर्गत खाद्यतेलाची गरज कशी भागवायची? असा प्रश्न सरकारासमोर पडणं स्वाभाविक नाही का ? हेही पाहा- Edible Oil news: देशात सोयातेल आयात वाढली गेल्या महिन्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये भारताने १०,१९९९७ टन वनस्पती तेलाची आयात केली आहे. ज्यात ९८,३६०८ टन खाद्यतेल आणि ३६,३८९ टन नॉन एडिबल तेलाचा समावेश आहे. फेब्रुवारी २०२१ च्या तुलनेत यावर्षी वनस्पती तेलाची आयात २२ टक्क्यांनी वाढलीय. गेल्या वर्षी भारताने ८३,८६०७ टन वनस्पती तेल आयात केलं होत.   भारताकडून महिन्याकाठी १ लाख ७५ हजार ते २ लाख टन सूर्यफूल तेलाची आयात करण्यात येते. रशिया युक्रेन संघर्षामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा खंडित झालाय. फेब्रुवारी २०२२ अखेरीस केवळ १,५२००० टन सूर्यफूल तेलाचीच आयात होऊ शकलीय. जर रशिया- युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबला नाही तर हा पुरवठा कधी पूर्ववत होईल, हे सांगता येत नाहीय.   हेही वाचा- खाद्यतेल तेजीत राहण्याची शक्यता देशातील खाद्यतेलाची गरज भावण्याएवढे उत्पादन देशात होत नसल्याची कबुली देताना केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भातील आकडेवारीच सादर केलीय. देशाची खाद्यतेलाची गरज २५० लाख टन आहे तर उत्पादन केवळ १११.६ लाख टन. यातील तफावत ५६ टक्क्यांची असून ती पोकळी भरून काढायला आयातीवर अवलंबून रहावं लागत असल्याचं मंत्रालयाचा म्हणणं आहे     केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार चीन आणि अमेरिकेखालोखाल खाद्यतेलाची सर्वाधिक आयात करणारा भारत हा तिसरा देश आहे. भारताकडून ६० टक्के पामतेल, २५ टक्के सोयाबीन तेल आणि १२ टक्के सूर्यफूल तेल आयात केलं जात.   खाद्यातेलाची ही खरेदी भारताला भलतीच महाग पडते. २०१९-२०२० दरम्यानच्या खाद्यतेलाच्या आयातीची आकडेवारी पाहिल्यास भारतानं त्यावर्षी १३३ लाख टन वनस्पती तेलासाठी ६१,५५९ कोटी रुपये मोजले होते.  गेल्या पाच वर्षातला वनस्पती तेलाचा दरडोई वापर प्रति व्यक्ती १९.८० किलो राहिलेला आहे. देशाच्या खाद्यतेलाच्या वाढत्या मागणीनुसार उत्पादनात वाढ होत नसल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार केंद्र सरकार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अभियान (National Food Security Mission) राबवत असून तेलबिया, पामतेल उत्पादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी तेलबिया लागवड क्षेत्र आणि उत्पादनवाढीवर भर दिला जात असल्याचं म्हटलं आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com