भारताचे दूध उत्पादन २० कोटी टनांवर; सहा वर्षात ३५ टक्के वाढ

गेल्या सहा वर्षांमध्ये (२०१५-१६ ते २०२०-२१) भारताच्या दूध उत्पादनात ३५ टक्क्यांची वाढ झाली असून ते २० कोटी टनांवर पोहचले आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी याबाबतची माहिती लोकसभेत दिली आहे.
India's Milk production
India's Milk production
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली - गेल्या सहा वर्षांमध्ये (२०१५-१६ ते २०२०-२१) भारताच्या दूध उत्पादनात (Milk Production) ३५ टक्क्यांची वाढ झाली असून ते २० कोटी टनांवर पोहचले आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Parashottam Rupala) यांनी याबाबतची माहिती लोकसभेत दिली आहे. कर्नाटकच्या दूध उत्पादनात (Karanatak Milk Production) गेल्या सहा वर्षात साडेपाच कोटी टनांची वाढ झाली आहे, तर एकूण उत्पादनात उत्तर प्रदेश अव्वलस्थानी आहे.  

लोकसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, २०२०-२१ मध्ये भारताचे दूध उत्पादन २१ कोटी टन झाले आहे. जे २०१५-१६ मध्ये १५५ कोटी टन होते. या कालावधित कर्नाटकचे दूध उत्पादन ७२.३९ टक्क्यांनी वाढले आहे.

प्रमुख उत्पादक - देशातील प्रमुख दूध उत्पादक राज्यांमध्ये २०२०-२१ मध्ये झालेल्या ३ कोटी टन उत्पादनासह उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) अव्वलस्थानी राहिला असला तरी, २०१९-२० च्या तुलनेत उत्पादनात १.५८ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या सहा वर्षाच्या कालावधित उत्तर प्रदेशचे दूध उत्पादन १८.८४ टक्क्यांनी वाढले आहे. २०१५-१८ वगळता गेल्या सहा वर्षात केरळमध्ये उत्पादनात घट झाली असून उत्पादनातील एकूण घट १.१५ लाख टन होती. तर आंध्र प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, अरूणाचल प्रदेश, मणिपूर आणि सिक्कीम या राज्यांमध्ये २०९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये उत्पादनात घट झाली आहे.

दरम्यान, देशातील दूध उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार काही प्रमुख केंद्र सरकारच्या आणि केंद्र पुरस्कृत योजना (Centrally Sponserd Scheme ) राबवत आहे, असे रुपाला यांनी लोकसभेत बोलताना सांगितले. देशी गोवंशाच्या जातींचा विकास व संवर्धन, दूध उत्पादकता वाढविण्यासाठी सरकारने देशात २०१४ पासून राष्ट्रीय गोकूळ अभियान (National Gokul Mission) राबविले आहे. ज्याचा फायदा या व्यवसायात असणाऱ्या शेतकऱ्यांना होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.