Animal Health : जनावरांच्या स्वास्थ्यासाठी यूबायोटिक्स

चारा, पशुखाद्यातील पोषणतत्त्वांच्या परिणामकारक उपयोग होण्यासाठी जनावरांच्या पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणू, प्रोटोझुआ, कवक यांचे संतुलन असणे गरजेचे आहे. यू बायोटिक्स या खाद्य पूरक घटकांमुळे पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणू व इतर मायक्रोफ्लोराचे संतुलन टिकवले जाते.
Animal Health
Animal HealthAgrowon

जनावरांच्या पचनव्यवस्था (Animal Digestive System) उत्तम राहून दूध उत्पादनवाढ, पोषणतत्त्वांच्या उपयोगिता वाढ आणि उत्तम आरोग्यासाठी जनावरांची पचनसंस्था महत्त्वाची असते. पचनसंस्थेचे आरोग्य (Animal Health) बिघडण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत ठरतात. त्यामध्ये प्रामुख्याने एकच प्रकारचा चारा जास्त प्रमाणात सतत खाणे, जास्त प्रमाणात पेंड/ धान्य/ पशुखाद्याचा आहारात वापर, तोंडावाटे वारंवार प्रतिजैविके देणे, मुरघासाचा आहारात जास्त प्रमाणात वापर, आहारातील अचानक बदल, कमी प्रतीचा चारा देणे इत्यादी कारणांचा समावेश असतो.

Animal Health
Animal Care : गाई, म्हशींतील दुग्धज्वराची लक्षणे, कारणे

चारा, पशुखाद्यातील पोषणतत्त्वांच्या परिणामकारक उपयोग होण्यासाठी जनावरांच्या पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणू, प्रोटोझुआ, कवक यांचे संतुलन असणे गरजेचे आहे. यू बायोटिक्स या खाद्य पूरक घटकांमुळे पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणू व इतर मायक्रोफ्लोराचे संतुलन टिकवले जाते.

पशुआहारात यू बोटिक्सचे फायदे ः
१. जनावरांच्या पचनसंस्थेचे आरोग्य टिकवून ठेवण्यास उपयुक्त.
२. प्रतिजैविकांचा वापर कमी होण्यास मदत.
३. चाऱ्याची पचनियता व उपयोगिता वाढते.
४. पचलेल्या पोषणतत्त्वांचे उत्तम प्रकारे शोषण होण्यास मदत.
५. वातावरणातील प्रदूषण टाळणे शक्य.
६. जनावरांची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत.
७. दूध उत्पादनात वाढ.

पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी ः

ऑरगॅनिक ॲसिड ः
- फॉरमिक ॲसिड, प्रोपिओनिक ॲसिड, लॅक्टीक ॲसिड, सायट्रिक ॲसिड इत्यादी आम्ल पचनसंस्थेचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात.
- ऑरगॅनिक ॲसिड्‌स प्रामुख्याने रवंथ करून प्रथिनांचे पचन करणाऱ्या विकरांचे प्रमाण वाढवतात. पोषणतत्त्वांची पचनीयता वाढण्यास मदत करतात.
- पचनसंस्थेतील विकरांची कार्यशिलता वाढण्यास उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत करतात.

प्रोबायोटिक्स ः
- हे एक उपयुक्त जिवाणू, यीस्टचे कल्चर असते. याच्या पशुआहारातील वापरामुळे पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणू, कवक, यीस्ट यांचे संतुलन राखण्यास मदत करतात.
- पचनक्षमता वाढून खाद्यघटकातील पोषणतत्त्वांचा जनावरांच्या शरीरासाठी वापर वाढण्यास मदत करतात.
- काही उपयुक्त जिवाणू विकर किंवा प्रथिने तयार करतात ते आजाराचा प्रादुर्भाव करणाऱ्या जिवाणूंना मारण्यासाठी मदत करतात. काही प्रोबायोटिक्समधील यीस्ट रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

प्रीबायोटिक्स ः
- हे आतड्यांचे आजार कमी करणे, प्रतिबंध करण्यासाठी मदत करते.
- उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी मदत करते.
- जनावरांचे पचनसंस्थेची व्यवस्थित हालचाल होऊन बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.

Animal Health
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

उपयुक्त तेल ः

- हे प्रामुख्याने वनस्पतींपासून मिळवलेले असतात. हे तेल प्रामुख्याने अॅन्टिऑक्सिडंट, जिवाणू विरोधी म्हणून, सूज- कमी करण्यासाठी किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कार्य करते.
- जनावरांच्या जलद वाढीसाठी मदत करतात. उपयुक्त तेल ही प्रामुख्याने सुगंधी वनस्पतींच्या फुले, अंकुर, बी, पाने, फांद्या, लाकूड, फळे किंवा मुळापासून मिळवलेले असतात.
- उपयुक्त तेल हे जंतनाशक म्हणून उपयोगी ठरते. यांचा मुख्यत: वापर कोंबडी, वराह यांच्यामध्ये केला जातो.

विकर ः
- खाद्य घटकांच्या विघटनास मदत करतात. त्याचबरोबर पोषणतत्त्वांच्या शरीरातील शोषणासाठी मदत करतात.
- विकर हे आतड्यातील चिकटपणा कमी करून तेथील वातावरण पचन व शोषण यासाठी सुस्थितीत ठेवण्यास मदत करतात.
- बीटा- ग्लुकानेज झायलेनेज, बीटा- मॅनेनेज, अमायलोलायटिक विकर यांचा रवंथ न करणाऱ्या जनावरांमध्ये उपयोग केला जातो.
- सेल्युलेज, हेमिसेल्युलेज, झायलेनेज या विकरांचा वापर रवंथ करणाऱ्या जनावरांत केला जातो.


संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com