माशांच्या खाद्यावरील खर्च असा कमी कराल !

मत्स्यपालन करत असताना बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चात बचत करून अधिक नफा मिळवता येऊ शकतो.
Biofloc culture tank
Biofloc culture tank
Published on
Updated on

मत्स्यशेतीत (fish farming) उत्पादन खर्चाच्या ५० टक्क्याहून अधिक खर्च हा माशांच्या (fish) खाद्यावर होत असतो. मत्स्यशेतीत चांगल्या प्रतीच्या पाण्याची उपलब्धता हा प्रश्न सध्या मत्स्यशेती करणाऱ्या लोकांसमोर निर्माण झाला आहे. त्यावर बायोफ्लॉक तंत्रज्ञान (biofloc) एक चांगला पर्याय आहे. बायोफ्लॉक हे असे तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये माशांच्या खाद्यावरील अतिरिक्त खर्च कमी करता येतो.

बायोफ्लॉक हे एक प्रकारचे जैवपूंज आहे. हे जैवपूंज तलावातील सेंद्रिय घटक म्हणजे उरलेले खाद्य, माशांची विष्ठा यांचा पुंजका असतो. हा पुंजका जीवाणूंनी सोडलेल्या चिकट पदार्थांच्या सहाय्याने एकत्रित बांधला जातो.

Biofloc culture tank
पांढरे तोंड असलेली म्हैस तुम्ही पाहिलीय का?

बायोफ्लॉक बॅक्टेरिया माशांच्या विष्ठेचे प्रथिनामध्ये रुपांतर करतात. तसेच मस्त्यशेती करत असताना पाण्याच्या गुणवत्तेविषयी अनेक समस्या उद्भवत असतात. मत्स्य शेती करत असताना, पाण्याची प्रत अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी वेळोवेळी पाणी बदलणेही गरजेचे असते. बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त घनतेमध्ये माशांची साठवणूक आणि कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो.

Biofloc culture tank
आकाराने लहान पण दुधातील फॅट जास्त असलेली जर्सी गाय

मत्स्यसंवर्धन तलावात उरलेले खाद्य, माशांची विष्ठा आणि अमोनिया साचून राहत असतो. साचून राहिलेल्या अमोनियाचे रुपांतर नायट्रोसोमोनस व नायट्रोकोकस जिवाणूंच्या साह्याने नायट्राईटमध्ये होत असते. नायट्राईट्चे रुपांतर नायट्रोबॅक्टर व नायट्रोस्पायरा जीवाणूंच्या सहाय्याने नायट्राईट आणि त्यांनतर नायट्रोजनमध्ये होत असते. अशा प्रकारे पाण्यात नायट्रोजनची उपलब्धता होत असते.

पाण्यात माशांची वाढ चांगली होण्यासाठी, नायट्रोजनच्या प्रमाणानुसार कार्बनचा पुरवठा करणे आवश्यक असते. कार्बन आणि नायट्रोजनचे गुणोत्तर १०:१ पेक्षा अधिक गेल्यास, पाण्यातील परपोषी पाण्यातील टाकाऊ पदार्थांचा वापर स्वतःच्या पोषणासाठी करतात. आणि पाण्यात विशिष्ठ जैवपूंज तयार होत असतो.

हा तयार झालेला जैवपूंज तलावात असणाऱ्या माशांनी खाद्य म्हणून वापरण्यासाठी तो पाण्यात तरंगत ठेवावा लागतो. अशा प्रकारे बायोफ्लॉक पद्धतीमध्ये तलावातील टाकाऊ पदार्थांचा खाद्य म्हणून वापर करून घेता येतो. या पद्धतीत पाण्यातील अमोनियाचे प्रमाण कमी करता येत असल्याने पाण्याची गुणवत्ता देखील राखण्यास मदत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com