म्हैसपालन (buffalo farming) म्हंटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात, मुऱ्हा (murrha), मेहसाना (Mehsana), जाफ्राबादी (Jafrabadi), पंढरपुरी (Pandhrpuri) यांसारख्या म्हशीच्या जाती. या म्हशींच्या जातीव्यतिरिक्त निलीरावी ही देखील म्हशीची एक जात आहे. निली रावी (niliravi) म्हैस देखील दूध उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
निलीरावी हे नाव निली आणि रावी अशा दोन वेगवेगळ्या म्हशींच्या जातीवरून पडले आहे. निली हे नाव उत्तर भरतातील सतलज नदीच्या निळ्या पाण्यावरून ठेवल्याचे म्हंटल जाते. रावी ही जात पाकिस्तानमधील मोंटगोमेरी आणि पंजाब मधील अमृतसर येथे आढळून येते. या दोन्ही जाती दूध उत्पादनात जवळपास सारख्या आहेत. सोबतच या दोन्ही जातीचे बाहेरील शारीरिक गुणधर्मही समान असल्याने त्यांना निलीरावी या एकाच नावाने संबोधले जाते.
निलीरावी म्हशींचा आकार हा मुऱ्हा जातीच्या म्हशींसारखाच आहे. या म्हशीची मान आणि तोंड लांब, कपाळ फुगीर, शिंगे मुऱ्हा म्हशीसारखी मागे पीळवटलेली असतात. या म्हशींचे डोळे घारे असतात. शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी पांढरा रंग असतो. यात कपाळावर, नाकपुड्या, तोंड याव्यतिरिक्त चारही पाय पांढऱ्या रंगाचे सॉक्स घातल्यासारखे दिसतात. शेपटीचा गोंडाही पांढऱ्या रंगाचा असतो.
या म्हशीच्या नवजात रेडकाचे वजन ३५ ते ४० किलोपर्यंत असते. प्रौढ म्हशीचे वजन ४५० ते ५५० किलो असते. पहिल्यांदा वयात येण्याचे वय हे ४० ते ५० महिन्याचे असते. एका वेतातील दूध उत्पादन १५०० ते २००० लिटर इतके असून दिवसाला ६ ते ९ लिटरपर्यंत दुधाचे उत्पादन मिळते. दोन वेतातील अंतर ४४५ ते ५८० दिवसांचा असतो.
निली रावी जातीच्या म्हशीचे संवर्धन हे, केंद्रीय म्हैस संशोधन संस्था, हिसार या ठिकाणी केले जाते. पंजाब हरियाना राज्यात मुऱ्हा, मेहसाना म्हशींना अधिक वाव मिळाल्याने निलीरावी म्हशीबद्दल फारशी माहिती नाही. पण विदेशातील अनेक देशांमध्ये स्थानिक जातींच्या म्हशींच्या सुधारणेसाठी निलीरावी म्हशीचा वापर केला जातो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.