Milk : शासकीय दूध संकलन केंद्राकडे उत्पादकांची पाठ

शासकीय खरेदीचे दर परवडत नसल्यामुळे दूध उत्पादकांनी दूध संकलन आणि प्रक्रिया केंद्राकडे पाठ फिरविली आहे.
MIlk
MIlkAgrowon

परभणी ः शासकीय खरेदीचे दर (Government Milk Rate) परवडत नसल्यामुळे दूध उत्पादकांनी (Milk Producer) दूध संकलन (Milk Collection) आणि प्रक्रिया केंद्राकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, दररोजच्या दूध संकलनात मोठी घट झाली. क्षमतेपेक्षा कमी दुधावर प्रक्रिया (Milk Processing) करुण अन्य ठिकाणी पोहोचविणे शक्य होत नाही. त्यामुळे परभणी येथील दुग्धशाळेतील दूध संकलन शनिवार (ता.६)पासून तात्पुरते बंद करण्यात आले आहे. दूध संकलनात वाढ न झाल्यास या दुग्धशाळेस कायमचे टाळे लागण्याची शक्यता आहे.

MIlk
Dairy : ‘आरे’चे दूध वितरण, संकलन बंद

परभणी येथील वसमत रस्त्यावरील एमआयडीसीमध्ये १९७९ मध्ये शासकीय दूध योजनेअंतर्गत दुग्धशाळा सुरू करण्यात आली. त्यामुळे या भागात शेतीपूरक दुग्ध व्यवसायाचा विस्तार झाला. प्रतिदिन ४० हजार लिटर दुधावर प्रक्रिया क्षमतेची यंत्रणा आहे. मध्यंतरीची काही वर्षे या ठिकाणी पॅकेजिंग युनिट कार्यरत होते. त्या वेळी दूध पॅकेटची विक्री केली जात असे. पॅकेजिंग युनिट बंद पडले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून संकलित दुधावर पाश्‍चरायझेशन प्रक्रिया करुण ते मुंबई, पुणे अन्य ठिकाणी पाठविले जात होते. या दुग्धशाळेत परभणी जिल्ह्यातील परभणी, पाथरी, गंगाखेड तसेच हिंगोली, नांदेड या पाच शीतकरण केंद्रावरून दूध संकलन केले जात होते.

MIlk
Milk : दुधातील फॅट कमी होण्याची कारणे कोणती ?

दरम्यान, गेल्या तीन-चार वर्षांपासून दर्जेदार दुधाला देण्यात येणारे कमी दर, दूध उत्पादक, सहकारी दूध उत्पादक संस्था, वाहतूकदारांची देयके वेळेवर अदा न करणे आदी कारणांनी दूध संकलनात घट सुरु झाली. त्यात पशुखाद्याचे दर वाढत आहेत. दर परवडत नसल्यामुळे दूध उत्पादकांच्या अडचणी वाढल्या. अनेक जण खासगी डेअरीकडे वळले. अनेकांनी व्यवसाय बंद केले. फॅट, एसएनएफ निकषानुसार गायीच्या दुधास प्रतिलिटर २५ रुपये, तर म्हशीच्या दुधास ३४ रुपये दर आहेत.

शासकीय दर आणि खासगी डेअरीच्या दरात लिटरमागे १० ते ११ रुपयांचा फरक आहे. यंदाच्या एप्रिलपासून गंगाखेड केंद्रावरील, तर मेपासून पाथरी येथील दूध संकलन बंद झाले. जूनमध्ये परभणी, हिंगोली, नांदेड केंद्रांवरील संकलन सुरू होते. जुलै महिन्यात परभणी, हिंगोली येथे संकलन झाले. ऑगस्ट महिन्यात पहिले पाच दिवस प्रतिदिन १५० ते २५० लिटर दूध संकलन झाले. त्यामुळे शनिवार (ता.६) पासून या ठिकाणचे दूध संकलन बंद करण्यात आले.

दूध संकलनाचा उतरता आलेख...

या दुग्धशाळेत यंदाच्या जानेवारीत प्रतिदिन ९ हजार ९८५ लिटर, फेब्रुवारीत प्रतिदिन सरासरी ७ हजार ७५५ लिटर, मार्चमध्ये प्रतिदिन सरासरी ६ हजार १२४ लिटर दूध संकलन झाले. एप्रिलमध्ये प्रतिदिन सरासरी ४ हजार २२९ लिटर, मेमध्ये प्रतिदिन २ हजार २८४ लिटर, जूनमध्ये प्रतिदिन २ हजार ३४३ लिटर, तर जुलैमध्ये प्रतिदिन १ हजार ८२५ लिटर दूध संकलन झाले.

दूध संकलनातील ऑगस्ट महिन्यात मोठी घट झाली. कमी दुधावर प्रक्रिया करून ते इतर ठिकाणी पोचते करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे दूध संकलन तात्पुरते बंद केले आहे.

- बी. ए. दाढेल, व्यवस्थापक

शासकीय दुग्धशाळा, परभणी

२०२२ महिनानिहाय दूध संकलन (लिटरमध्ये)

महिना...दूध संकलन

जानेवारी...३०९५४०

फेब्रुवारी...२१७१३९

मार्च...१८९९८४

एप्रिल...१२६८७२

मे...७०७९२

जून...७०२९६

जुलै...५६५७६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com