शेतकरी नियोजन - दुग्ध व्यवसाय

सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात सर्वाधिक दुग्ध उत्पादन होते.
Dairy business
Dairy businessAgrowon

शेतकरी नाव- हाफीज हसन काझी

चौधरवाडी, ता. फलटण, जि. सातारा

शेती ः ३० एकर

गोठा ः २४ गाई (मुक्त संचार पद्धत).

---

सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात सर्वाधिक दुग्ध उत्पादन होते. या तालुक्यातील चौधरवाडी येथील हाफिज हसन काझी यांची ३० एकर शेती आहे. त्यात ऊस पिकांसह सोयाबीन, हरभरा, मका इ. पिके घेतात. हाफिज यांचे चार भावाचे कुटुंब असून, यापैकी अनिष, असिफ हे दोघे नोकरी व व्यवसाय करतात. तर नफीज हे दोन नंबरचे बंधू हाफिज यांना शेती व दुग्ध व्यवसायास मदत करतात. पूर्वी त्यांच्याकडे वडिलोपार्जित चार गाईचे संगोपन केले जाई. दरम्यान तालुक्यात गोविंद मिल्कने राबविलेली मुक्तसंचार गोठ्याची पद्धत हाफिज यांनी भावली. आपला गोठाही मुक्तसंचार पद्धतीमध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय घेतला. २०१२ मध्ये घराशेजारील बंदिस्त गोठ्यालगतच मोकळ्या जागेत ८० बाय ८० फूट आकाराचा मुक्तसंचार गोठा केला आहे. जमिनीवर पाचट, सोयाबीन भुश्‍शाचा वापर केला, तर पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली.

असे चालते नियोजन

  • - चाऱ्यावरील खर्च कमी ठेवण्यासाठी बहुतांशी हिरवा व सुका चाऱ्याचे उत्पादन स्वतःच्या शेतात घेण्याचा प्रयत्न असतो.

  • - मुक्तसंचार गोठ्यामुळे २४ ते २५ गाईच्या संगोपन अवघ्या दोन ते तीन जणात शक्य होते.

  • - पौष्टिक चाऱ्यासाठी वर्षाकाठी दहा ते ११ टनावर थैलीत मुरघास केले जाते.

  • - वर्षभर दुग्ध उत्पादन सुरू राहण्याच्या दृष्टीने गाभण गाईचे नियोजन केले जाते.

  • - गाईच्या धारा व चारापाणी यावर काझी बंधूंचे लक्ष असते.

  • - उन्हाळ्यात गोठ्यात तसेच मुक्त गोठ्यात गारवा राहण्यासाठी मायक्रो स्प्रिंकलरचा वापर केला जातो.

  • - उन्हाळ्यात ७५ टक्के ओला व २५ टक्के सुका चारा या सूत्राने चारा देतात.

  • - वर्षभर प्रतिदिन सरासरी ३०० लिटर दूध उत्पादन मिळते.

  • - या व्यवसायातून शेणखताची उपलब्धता होत असून, शेतीतील रासायनिक खतावरील ५० टक्के खर्चात बचत होते.

भाकड गाई करतात दुभत्या

हाफिज यांनी २०१७ मध्ये चार भाकड गाईची ८० हजार रुपयांत खरेदी केली. या गाईंचे चारापाणी व व्यवस्थापनावर जातीने लक्ष दिले. त्यातून आरोग्य सुधारल्यानंतर गोविंद मिल्ककडून दर्जेदार सिमेन्सद्वारे गाभण करविल्या. एकेकाळी भाकड ठरविलेल्या या गाई सध्या दूध देत आहेत. त्यांची दूध क्षमताही चांगलीच वाढली आहे.

मदत मार्गदर्शन

शेती आणि दुग्ध व्यवसायात बंधू नफीस यांची मोठी मदत होते. या व्यवसायात गोविंद मिल्कचे व्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड, गणेश चव्हाण आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब पताळे, डॉ. नीलेश निंबाळकर यांचे सहकार्य मिळत असल्याचे हाफिज यांनी सांगितले.

हाफिज हसन काझी, ९९७५२४६४१२

(शब्दांकन ः विकास जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com