Dairy : लांजातील सहकारी दूध संस्था अडचणीत

शासनाकडून लांजा येथील सहकारी दूध उत्पादक संस्थेचे ३० लाख रुपयांचे येणे बाकी असल्याने संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे.
Dairy
Dairy Agrowon

लांजा, जि. रत्नागिरी ः शासनाकडून लांजा येथील सहकारी दूध उत्पादक संस्थेचे (Co-Operative Milk Producer Organization) ३० लाख रुपयांचे येणे बाकी असल्याने संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. अशात १ नोव्हेंबरपासून आपले दूध (Milk Collection) स्वीकारले जाणार नाही, असे पत्र शासकीय दूध योजना (Government Milk Scheme) रत्नागिरीचे दुग्ध शाळा व्यवस्थापक यांनी लांजा सहकारी दूध संस्थेला दिले आहे. यामुळे दूध संकलनाचे करायचे काय, असा प्रश्न संस्थेसमोर निर्माण झाला आहे.

Dairy
Dairy : नॅचरल दूध देणार दूध उत्पादकांसह संकलकांना बोनस ः बी. बी. ठोंबरे

लांजा सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे पाच महिन्यांचे सुमारे ३० लाख रुपये शासनाकडे थकित आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे लांजातील सहकारी दूध व्यावसायिक संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे.

अशी परिस्थिती असताना देय असलेल्या ३० लाख रुपयांपैकी केवळ साडेसहा लाख रुपये शासनाने देऊन संस्थेची बोळवण केली. मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी असताना केवळ साडेसहा लाख रुपये शासनाने दिले आहेत.

Dairy
Amul Dairy : पाच सहकारी संस्था अमूलमध्ये विलीन करणार : अमित शाह

त्यामुळे नेमके करायचे काय, असा प्रश्न संस्थेसमोर निर्माण झाला आहे, असे असताना आता दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दूध योजना रत्नागिरी यांनी नवा फतवा जाहीर केला आहे. यामध्ये रत्नागिरी योजनेत कार्यरत असलेले प्रशितन यंत्रचालक राऊळ हे ३१ ऑक्‍टोबरला सेवानिवृत्त होत आहेत.

त्यांच्या जागी वरिष्ठ कार्यालयाने मागणी करूनसुद्धा पर्यायी प्रशितन यंत्रचालक उपलब्ध करून दिलेला नसल्याने दूध प्रक्रिया करणे शक्य होणार नाही. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून आपण संकलित केलेले दूध या योजनेत आम्ही स्वीकारणार नाही, असे लेखी पत्र दिल्याने संस्था पुन्हा अडचणीत आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com