जागतिक दूध दिनाच्या निमित्ताने !

आज १ जून, हा दिवस आपण जागतिक दूध दिन म्हणून साजरा करतो. तर या दिवसाच्या निमित्ताने दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांना, जागतिक दूध दिनाच्या खुप साऱ्या शुभेच्छा.
World Milk Day
World Milk DayAgrowon

आज १ जून, हा दिवस आपण जागतिक दूध दिन (world milk day) म्हणून साजरा करतो. तर या दिवसाच्या निमित्ताने दूध व दुग्धजन्य पदार्थांचे (milk and milk products) सेवन करणाऱ्या लोकांना, जागतिक दूध दिनाच्या खुप साऱ्या शुभेच्छा. मानवी शरीराला असलेली दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दुग्ध दिवस साजरा केला जातो.

२००१ पासून आपण दरवर्षी 'जागतिक दूध दिन' (world milk day) साजरा करतो. तेव्हापासून डेअरी क्षेत्रामध्ये अनेक बदल होत आहेत. डेअरी क्षेत्रामध्ये सध्या अनेक प्रयोगशील युवक कार्यरत आहेत. या युवकांमध्ये डेअरी (dairy) क्षेत्रातील होत असलेले बदल, सुधारणा या बद्दल कमालीची उत्सुकता आहे. हा युवक आपल्या सोबत इतर दूध व्यवसायिकांनाही शास्त्रीय पद्धतीने डेअरी व्यवसाय (dairy buisness) करण्यासाठी प्रोत्साहन देतोय.

World Milk Day
दुधातून होईल कुपोषणावर मात...

भारतातील दूध व दुग्धजन्य पदार्थांचे बाजारातील मूल्य खुप मोठे आहे. याशिवाय कोट्यावधी दूध उत्पादक शेतकरी, त्यांची वाहतूक करणारे, दुधावर प्रक्रिया करून त्यापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणारे लोक आणि त्यांची संख्याही तेवढीच मोठी आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून उदयास आलेला हा दुधाचा धंदा ग्रामीण अर्थव्यवस्थेचं अर्थकारण बदलू लागलाय.

World Milk Day
दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील घटकांचा अभ्यास...

लहान मुलांच्या वाढीसाठी, त्यांना निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक असे सर्व पोषक घटक दुधात असल्याने, दुधाला आपण पूर्णान्न (complete food) संबोधतो. सहज उपलब्ध असलेला कॅल्शियमचा स्रोत म्हणून दूध उपयुक्त आहे. दूध फक्त भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातल्या लोकांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. म्हणून दूध प्या, निरोगी राहा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com