Animal Vaccination : जनावरांसाठी लसीकरणाचा बुस्टर डोस का आहे महत्वाचा?

Animal Care : काही अाजारांमध्ये प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अावश्यक असते. लसीकरणामध्ये बुस्टर डोस हा शब्ददेखील आपण नेहमीच ऐकतो. बुस्टर डोस मुळे जनावरांचा आजाराप्रती रोगप्रतीकार शक्ती जोमाने वाढण्यास मदत होते.
Animal Vaccination
Animal VaccinationAgrowon
Published on
Updated on

Vaccination Booster Dose : काही अाजारांमध्ये प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अावश्यक असते. लसीकरणामध्ये बुस्टर डोस हा शब्ददेखील आपण नेहमीच ऐकतो. बुस्टर डोस मुळे जनावरांचा आजाराप्रती रोगप्रतीकार शक्ती जोमाने वाढण्यास मदत होते.

जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार अाढळतात. यामध्ये काही चयापचायाचे म्हणजेच मेटाबोलिक आजार असतात; पण बरेचसे आजार मात्र संसर्गजन्य असतात. चायापचयाचे आजार चारा-पाण्याचे योग्य व्यवस्थापान करून दूर करता येतात. लस म्हणजे जैविक पद्धतीने विशिष्ट आजाराच्या रोगजंतूंपासून किंवा तशाच प्रकारच्या जंतूंच्या पेशींपासून कृत्रिमरीत्या तयार केले जाणारे द्रावण आहे.

Animal Vaccination
Pule Crop Benefits : कडधान्य पिके जमिन सुपिकतेसाठी ठरतात बुस्टर डोस

हे द्रावण कृत्रिमरीत्या जनावराला देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. लसीतील जंतूंवर प्रयोगशाळेत काही प्रक्रिया केलेल्या असतात. यामुळे त्या जंतूंची रोग निर्माण करायची क्षमता नाहीशी केली जाते किंवा त्यांना मारले जाते. अशी निरुपद्रवी जंतूंची लस जनावरांना दिल्यानंतर त्या जनावरांमध्ये त्या ठराविक रोगासाठी प्रतिकारशक्ति निर्माण होत असते.

लसीकरणामध्ये बुस्टर डोस हा शब्ददेखील आपण नेहमीच ऐकतो. बुस्टर म्हणजे काय की एकदा आपण लस दिली तर त्या लसीचा परिणाम व्हायला साधारण पंधरा ते एकवीस दिवस लागतात.ही पहिली मात्रा तेवढी परिणामकारक नसते; पण हीच लस जर दुसऱ्यांदा पंधरा दिवसांत परत दिली तर मात्र पांढऱ्या पेशी परत दुसऱ्यांदा जागृत होतात आणि दुप्पट क्षमतेने त्यांची रोगप्रतिकारशक्ती आणि स्मृती कार्यान्वित होते.

रोग झाल्यावर त्या अधिक जलदगतीने कामाला लागतात. म्हणून प्रथम लसीकरण केल्यानंतर त्याच रोगाच्या लसीची पंधरा दिवसांत दुसरी मात्रा देणे म्हणजेच बुस्टर देणे आवश्यक आसते.या रोगाच्या लसीची स्मृती ठराविक कलवधीसाठीच, सर्वसाधारणपणे सहा ते बारा महिन्यांसाठी राहात असल्याने त्या त्या कालावधीत पुन्हा लसीकरण करून घेऊन पांढऱ्या पेशींना कायम त्या रोगासाठी तत्पर ठेवावे लागते. म्हणून लसीकरण सहा ते बारा महिन्यांत पुन्हा करून घेणे आवश्यक असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com