Team Agrowon
आहारामध्ये पोषणाच्या दृष्टीने जशी कडधान्य पिके महत्त्वाची आहेत, तशीच ती जमिनीसाठीही महत्त्वाची आहेत. कारण या पिकांच्या मुळांवरील नत्राच्या गाठींद्वारे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते.
प्रामुख्याने खरीप व रब्बी हंगामात तूर, मूग, उडीद, मटकी, चवळी, हरभरा इ. कडधान्य पिकांची लागवड केली जाते.
कडधान्य पिकांची झुपकेदार वाढ होत असल्याने जमिनीवर सावली राहते. त्याखाली हवा खेळती राहिल्याने सूक्ष्म जिवांच्या वाढीला चालना मिळते. यामुळे जमिनीची संरचना सुधारते.
मातीच्या कणांचा आकार व घनता कमी झाल्याने जमीन भुसभुशीत होते. तिच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
कडधान्य पिकामध्ये पाला मोठ्या प्रमाणात जमिनीत पडत असतो. तो कुजण्याची क्रिया कर्ब व नत्राच्या प्रमाणावर अवलंबून असते. मात्र कडधान्य पिकामध्ये स्थिर झालेल्या नत्राने या पालापाचोळ्यातील कर्बाचे रूपांतर सेंद्रिय कर्बात रूपांतर होते.
या शिल्लक राहिलेल्या नत्र आणि सेंद्रिय कर्बाचा फायदा पुढील पिकांना होत असतो. म्हणूनच फेरपालटामध्ये कडधान्य पिकांचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. पालापाचोळा पडल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो.
या पिकांच्या काढणीनंतरही भरपूर प्रमाणात अवशेष शिल्लक राहतात. ते लहान तुकडे किंवा कुट्टी करून गाडल्यास जमिनीत आणखी सेंद्रिय पदार्थांची भर पडते. सूक्ष्म जिवाणूंना अन्न उपलब्ध झाल्यामुळे त्यांची संख्या वाढते.अलीकडे सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी होत आहे.
Mango Crop Management : भरपूर फळांच्या उत्पादनासाठी आंबा बागेचं नियोजन