
कोणताही व्यवसाय करताना व्यवसायात आपण किती पैसे खर्च करतो आणि किती पैसे येतात हे केवळ नोंदी ठेवल्यानेच कळू शकते.
पशुपालन व्यवसाय करत असताना, जनावरांच्या महत्त्वाच्या नोंदी म्हणजे प्रजोत्पादन, दूध उत्पादन, औषध उपचार यांसारख्या गोष्टींच्या काटेकोर नोंदी ठेवल्या पाहिजे.नोंदी ठेवल्यामुळे व्यवसाय फायदेशीर आहे की तोट्याचा हे कळते.
आपल्या गोठ्यातील जनावरांच्या प्रजातीनुसार,त्यांच्या गुणधर्मानुसार नोंदी केल्यास योग्य समतोल राखून नफा मिळवणे शक्य होते.
एक पशुपालक म्हणून फक्त तुमच्या गोठ्यात किती जनावरे आहेत हे माहित असून चालणार नाही, तर किती जनावरे दुधात आहेत? कोणते जनावर किती दुध देते? कोणते जनावर आजारी आहे? त्यावर कोणते औषधोपचार केलेत?
साथीच्या रोगांचे प्रमाण किती आहे? या सर्व गोष्टींचे निराकरण करण्यासाठी आणि होणारं आर्थिक नुकसान टळण्यासाठी नोंदी ठेवण फायद्याचं ठरतं.
नोंदी ठेवल्याने काय फायदा होतो ?
- कळपातील जनावरांची पैदास क्षमता, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांची आनुवंशिकता माहिती असायला हवी. यासाठी जनावरांची वंशावळ पत्रिका बनविण्यासाठी नोंदीचा उपयोग होतो.
- कळपातील एकाच प्रजातीतील प्रत्येक जनावराची उत्पादनक्षमता वेगवेगळी असते. कळपातील उच्च प्रतीच्या पैदासक्षम जनावरांच्या निवडीसाठी नोंदी आवश्यक असतात.
- आपल्याच कळपातील जनावरांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठीही नोंदीचा उपयोग होतो.
- निरोगी जनावर हा दुग्ध व्यवसायाचा कणा आहे. आपल्या कळपातील निरोगी जनावरे, आजारी जनावरे, औषधोपचारांचे नियोजन या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी नोंदी आवश्यक ठरतात.
नोंदवहीत कोणकोणत्या नोंदी ठेवाव्यात
आपल्या गोठ्यात किती वासरे आहेत. कृत्रिम रेतन, दैनंदिन दुधाच्या नोंदी दूध उत्पादन, दैनंदिन पशुखाद्याचं प्रमाण
औषध उपचार, लसीकरण, जंत, गोचीड निर्मूलनाची नोंद ठेवावी.
याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे दैनंदिन जमा खर्च आणि पशूप्रजननाच्या नोंदीही नोंदवहीत ठेवता येतात.
अशा प्रकारे नोंदवहीत महत्वाच्या नोंदी ठेवून व्यावसाय फायदेशिर आहे की तोट्याचा याचा अंदाज येतो. त्यामुळे नोंदवहीला अनन्यसाधारण महत्व आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.