Animal Care : खाऱ्या पाण्याचा जनावरांवर काय परिणाम होतो?

खाऱ्या पाण्यामध्ये कार्बोनेटस्‌, बायकार्बोनेटस्‌, क्‍लोराईडस्‌ आणि सल्फेट चे प्रमाण अधिक असत. दुभती जनावर आणि शेती काम करणारी जनावर यांना आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याची गरज असते.
Animal Care
Animal Care Agrowon

खाऱ्या पाण्याचा परिणाम जसा मानवी शरिरावर होतो तसाच तो जनावरांच्या शरिरावरही होतो. घटती भुजल पातळी तसच पाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे क्षार मिसळल्यामुळे पाणी क्षारयुक्त (Salty Water) म्हणजेच खारे होते.  

खाऱ्या पाण्यामध्ये कार्बोनेटस्‌, बायकार्बोनेटस्‌, क्‍लोराईडस्‌ आणि सल्फेट चे प्रमाण अधिक असत. दुभती जनावर आणि शेती काम करणारी जनावर यांना आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याची गरज असते.

अशी जनावर जर खारे पाणी पीत असतील तर त्यांना पचन संस्था, प्रजनन संस्था तसच मुत्राशयाचे आजार होण्याची शक्‍यता जास्त असते.

सतत खारे पाणी पिणाऱ्या जनावरांच्या शरिरावर काय परिणाम होतात? याविषयी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.  

Animal Care
Animal Care : थंडीचा होतोय जनावरांवर परिणाम

खारे पाणी पिणारी जनावरे नियमित चारा खात असली तरी सतत खारे पाणी पिण्यामुळे जनावरांच्या पोटात उपयुक्‍त असणारे जीवाणू व प्रोटोझुआच प्रमाण कमी होऊन अन्न पचन करण्याची प्रक्रिया बिघडते.अन्नाच उत्सर्जन योग्य प्रकारे होत नाही.

जनावरांची पचन शक्‍ती कमी झाल्यामुळे पोषक द्रव्यांचे योग्यरित्या पचन व शोषण होत नाही. त्यामुळे दुग्धउत्पादनावर परिणाम होतो.

Animal Care
Animal Care : जनावरांमध्ये चिलटांमुळे होतो हा आजार

खारे पाणी पिल्यामुळे जनावरांच्या शरीरातील द्रव्यघटकातील परासरण दाब वाढतो. परिणामी जनावरांच वजन आणि उत्पादनक्षमतेत घट होते.

सोबतच थायरॉइडपासून निघणाऱ्या स्त्रावाच्या प्रमाणात कमतरता होते. हा द्रव शरीरात प्रथिनांच्या उत्पत्तीसाठी आवश्यक असल्याने शरीरातील प्रथिने तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. त्याचा विपरीत परिणाम जनावरांच्या उत्पादनक्षमतेवर होतो.

खारे पाणी पिणाऱ्या गाई आणि नियमित गोडे पाणी पिणाऱ्या गाई यांच्या दुधाच्या उत्पादनात थंड हवामानाच्या वेळी विशेष फरक जाणवत नसला तरी उन्हाळ्यात मात्र खारे पाणी पिणाऱ्या गायीची उत्पादनक्षमता कमी होते.

परिणामी खारे पाणी पिणाऱ्या जनावरांपासून कमी दूध मिळत.

सतत खारे पाणी पिणाऱ्या जनावरांमध्ये खनिजांचे शोषण व उत्सर्जन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. एखाद्या विशेष खनिजांचे शरीरातील साठवणीचे प्रमाण कमी होत.

खारे पाणी पिण्यामुळे मूत्र व विद्युत अपघटनीचे उत्सर्जनाच प्रमाण वाढत. मुत्रात सोडियम व क्‍लोराईडच प्रमाण वाढत, पोटॅशिअमच प्रमाण कमी होत.

खाऱ्या पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्यामुळे मुत्रपिंडामध्ये विद्युत अपघटनीचे, गाळण्याची आणि त्यामुळे परत शोषण्याची प्रक्रिया कमी होते.

अधिक खारे पाणी पिणाऱ्या जनावरांमधे रक्‍तद्रव्य, विद्युत अपघटनीचे प्रमाण व जास्तीचे क्षार मुत्रातून उत्सर्जित होतात.

रक्‍तातील युरीया व क्रियेटीननचे प्रमाण वाढून मुत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. शेणातून पोटॅशिअमचे उत्सर्जित होण्याचे प्रमाण कमी होऊन शोषणाचे प्रमाण जठर,आतड्यात वाढते.

खारे पाणी पिणाऱ्या जनावरांच्या रक्‍तातील हिमोग्लोबीन, ऑक्‍सिजन, रक्‍तघटक उदा. अल्बुमीन व ग्लोबुलीन प्रथिने इत्यादीचे प्रमाण कमी होत.

परिणामी, जनावरांची रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होऊन जनावरे विविध रोगांना बळी पडतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com