विदेशी मागूरवर बंदी कशासाठी?

भारतात मागूर माशाची प्रजात चांगली प्रसिद्ध आहे. हा मासा त्याच्या लांब मिशांमुळे कॅटफिशमध्ये समाविष्ट केला गेला आहे
Magur fish
Magur fishAgrowon
Published on
Updated on

भारतात मागूर माशाची (magur fish) प्रजात चांगली प्रसिद्ध आहे. हा मासा त्याच्या लांब मिशांमुळे कॅटफिशमध्ये (catfish)समाविष्ट केला गेला आहे. देशी मागुर मासा त्याच्या उत्तम चवीसाठी प्रसिद्ध आहे. देशी मागूर माशाबरोबर विदेशी थाई मागुरचेही संवर्धन भारतात केले जाते. परंतु हा थाई मागूर (thai magur) मानवी आरोग्यास हानिकारक असतो.

थाई मागूर (Thai magur) जलीय परिसंस्थांमधील (water ecosystem) इतर घटकांसाठी हानिकारक आहे. तसेच हा मासा (fish) इतर प्रजाती लुप्त होण्यासही कारणीभूत समजला जातो. थाई मागुर दिसायला देशी मागूरसारखाच असल्याने या दोन्ही माशांतील फरक ओळखणे गरजेचे आहे. हा मासा अनेकदा अजैविक कचऱ्याचे सेवन करतो. माशाच्या मांसात अनेकदा जड धातू जसे झिंक (zinc) , कॅडमिअम आणि आर्सेनिकचे संक्रमणसुद्धा आढळून आलेले आहे. हे धातू मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक असल्याने, १९९७ मध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मासेमारी विभागातर्फे थाई मागूर माशावर बंदी घातली होती.

Magur fish
शेती कामांसाठी बैल जोडीची निवड कशी करावी? | Bullock Pair for Agriculture Work | ॲग्रोवन

हिरवट तांबूस रंगाच्या या माशाचे डोके चपटे असते. जबडा देखील चपटा असून वरच्या आणि खालच्या जबड्यास प्रत्येकी चार अशा एकूण आठ मिशा असतात. पाठीवरील पर लांब असतो. मात्र तो शेपटीच्या पराशी जोडलेला नसतो.या माशाच्या अंगावर खवले नसतात.

मागूर मासे पाण्याच्या तळाशी राहतात. तलावातील किडे, अळ्या, छोटे मासे हे त्यांचे मुख्य खाद्य असते. मागूर माशाची मादी तलावाच्या किनाऱ्याजवळ घरटे करून त्यात अंडी घालते. या माशामध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन श्वसन करण्यासाठी खास श्वसनेन्द्रिय असतात. त्यामुळे हा मासा श्वसनासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येतो.

Magur fish
Fisheries : माशांना कोणते कृत्रिम खाद्य द्यावे ?

हवेत श्वसन करण्याची, पाण्यातील कमी प्राणवायुमध्ये जिवंत राहण्याची क्षमता असल्याने या माशाचे संवर्धन वाढते. या माशाची लांबी ४५ सेंटीमीटर पर्यंत वाढत असते. वजनवाढ जास्तीत जास्त १ किलोपर्यत होत असते. या माशामध्ये खनिजे, लोह व प्रथिने यांचे प्रमाण अधिक असते. तर मेदाचे प्रमाण अत्यंत कमी असते. मागूर माशाच्या औषधी गुणधर्मामुळे त्याला न्यूट्रिशिअस मासा म्हणून ओळखला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com