
माशांच्या चांगल्या वाढीसाठी (fish growth) चांगल्या प्रकारच्या खाद्याचा पुरवठा करणे गरजेचे असते. माशांच्या वाढीसाठी कृत्रिम अन्न (artificial feed) देणेही आवश्यक आहे. माशांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृत्रिम खाद्याचे वाटप देखील समप्रमाणात झाले पाहिजे. माशांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य खाद्याचा पुरवठा करावा लागतो.
प्राणीजन्य अन्नामध्ये सागरी किंवा गोड्या पाण्यातील लहान-लहान ताज्या माशांचा समावेश होतो. अशा माशांची भुकटी तयार करून माशांना खाण्यासाठी दिली जाते. कोंबडी किंवा प्राण्यांपासून मिळणारे ताजे मांस टाकले असता, माशांना चांगल्या प्रतीची प्रथिने मिळतात. जे मासे खाण्यासाठी वापरले जात नाही. माशांपासून तेल काढल्यानंतर राहिलेले डोके आणि मांस यांचे तुकडे करून भुकटी करतात. कत्तलखाण्यातील रक्ताचा वापरही चांगले अन्न म्हणून केला जातो. या रक्तात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. हे रक्त सुकवून ते माशांना खाण्यासाठी दिले जाते. काहीवेळेस गांडूळाचे लहान-लहान तुकडे करून तलावात टाकतात. यामुळे माशांना चांगला फायदा होतो.
वनस्पतीजन्य खाद्यामध्ये विविध तृणधान्य जसे की तांदूळ, गहू तलावात टाकल्याने माशांची वाढ चांगल्या प्रकारे होते. पाण्यात वनस्पतींची पाने, केळी भाजीपाला यांचा उपयोग गवत्या किंवा ग्रास कार्पसाठी होतो.
तलावात खाद्याचे वाटप करताना ते सकाळी टाकावे. खाद्य टाकण्याच्या वेळेस संपूर्ण तलावावर न टाकता काही ठराविक ठिकाणीच टाकावे. अशी हेक्टरी चार ते पाच ठिकाणे असावी. त्यामुळे सर्व माशांना खाद्य मिळण्यास मदत होते. खाद्य वाटपासाठी निवडलेले ठिकाण स्वच्छ आणि जवळपास १ मीटर खोल असावे. या ठिकाणी वनस्पती असू नयेत. तळाकडील भाग कठीण असावा. खाद्य देताना नेहमी तापमानाकडे लक्ष द्यावे. कारण कार्प मासे १३ अंश सेल्सिअसच्या खाली आणि २७ अंश सेल्सिअसच्या वर खाद्य खात नाहीत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.