Livestock Market : बेल्हे येथे जनावरांचा आठवडे बाजार सुरू

बेल्हे येथे दर सोमवारी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात जनावरांचा प्रसिद्ध आठवडे बैल बाजार भरतो. तो लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर बंद होता.
Livestock Market
Livestock Market Agrowon

बेल्हे, ता. जुन्नर ः येथील चार महिन्यांपासून लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला सोमवारचा जनावरांचा आठवडे बैल बाजार (Livestock Market) सोमवारपासून (ता. २) पुन्हा पूर्ववत सुरू झाला असल्याची माहिती जुन्नर बाजार समितीचे माजी संचालक व म्हशींचे व्यापारी संजय सांखला यांनी केली आहे.

Livestock Market
Lumpy Skin Vaccine : लम्पी स्कीन’ लसीची राज्यात निर्मिती

बेल्हे येथे दर सोमवारी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात जनावरांचा प्रसिद्ध आठवडे बैल बाजार भरतो. तो लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर बंद होता. मात्र शेळ्या-मेंढ्यांचा बाजार सुरळीतपणे सुरू होता.

Livestock Market
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे ४१९ जनावरांचा मृत्यू

बैल बाजार सुरू झाल्याने शेतकरी वर्ग व व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यासोबत म्हशींचा बाजार पुन्हा सुरू झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची म्हैस खरेदीची गैरसोय दूर होणार आहे.

जुन्नर तालुक्यात बेल्हे येथे म्हशींचा हा एकमेव बाजार आहे. याठिकाणी म्हशींच्या खरेदी-विक्रीसाठी शेतकरी येत असतात. म्हशीसाठी स्वतंत्र जागा नसल्याने संबंधितांची गैरसोय होते. बेल्ह्यात म्हशींच्या बाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करावी, अशी मागणी सांखला यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com