Lumpy Vaccination
Lumpy VaccinationAgrowon

Lumpy Vaccination : जनावरांचे सरसकट लसीकरण सुरू

उपचारानंतर ४८ जनावरे या आजारातून बरी झाली आहेत. सध्या जिल्ह्यात ३२ जनावेर ‘लम्पी स्कीन’ बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Published on

परभणी : जिल्ह्यात बुधवार (ता. २१) (Parbhani Lumpy Update) पर्यंत पाच तालुक्यातील २७ गावांतील ८० जनावरांना ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) आजाराचा प्रार्द्रुभाव झाला होता. त्यापैकी उपचारानंतर (Lumpy Vaccination) ४८ जनावरे या आजारातून बरी झाली आहेत. सध्या जिल्ह्यात ३२ जनावेर ‘लम्पी स्कीन’ बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Lumpy Vaccination
Lumpy Skin : धुळे जिल्ह्यात ३१४ जनावरे बाधित

बुधवार (ता. २१) ६९ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. बाधित क्षेत्राबाहेरील जनावरांचे लसीकरण बुधवार (ता. २१) पासून सुरु करण्यात आले. जिल्ह्यातील २ लाख ९९ हजारावर जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी .नेमाडे यांनी दिली.

Lumpy Vaccination
Eknath Shinde : अतिवृष्टीने नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

परभणी जिल्ह्यातील गायवर्गीय आणि म्हैस वर्गीय जनावरांची एकूण संख्या ३ लाख ९८ हजार ३५६ आहे. त्यात गायीची संख्या १ लाख ३७ हजार १५०, बैलांची संख्या १ लाख ६२ हजार ७११, म्हशीची संख्या ९८ हजार ४९५ आहे. जिल्ह्यातील नऊ पैकी पाच तालुक्यातील २७ गावांतील ८० जनावरांना लम्पी स्किनचा प्राद्रुर्भाव झाला होता.

Lumpy Vaccination
Sunday Farmer : अनुभवातून शिकतोय शेती...

त्यात बलसा, बोबडे टाकळी, मांगणगाव, जांब, झरी, वाडी दमई, सनपुरी, पोखर्णी, बोरी, कोक, वाघी बोबडे, पांगरी, कोरवाडी, सेलू, कान्हड, कुपटा, आहेरबोरगाव, देवगाव, खवणे पिंपरी, राधेधामणगाव, पिंपळा, रामपुरी बुद्रुक, पूर्णा, आलेगाव, चुडावा, फुलकळस, दगडवाडी या गावांचा समावेश आहे.

बाधित गावांच्या ५ किलोमीटर परिसरातील गावांची संख्या १४१ असून या गावांमधील गायींची संख्या २४ हजार ७७८, बैलांची संख्या ३७ हजार ४३५ एवढी आहे. या आजाराचा प्रसार टाळण्यासाठी ६९ हजार ९४८ जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आजवर जिल्ह्यात २ लाख ४ हजार लसींचा पुरवठा झाला आहे.

सुमारे ६९ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’मुळे आजवर जनावरांचा मृत्यू झाला नाही. या आजारावरील उपचार मोफत केले जात आहेत. बुधवार (ता. २१) पासून बाधित क्षेत्राबाहेरील गावातील जनावरांच्या लसीकरणास सुरवात झाली आहे.

एकूण २ लाख ९९ हजार ८६१ जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे असे डॉ. नेमाडे यांनी सांगितले. परभणी जिल्हा लम्पी स्कीन स्थिती (बुधवार ता.२१ पर्यंतची)

पशुधन एकूण संख्या बाधित जनावरे बरी झालेले जनावरे

गाय १३७१५० ३२ २१

बैल १६२७११ ४६ २५

म्हैस ९८४९५ २ २

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com